दहावीचा आज निकाल (फोटो सौजन्य-X)
maharashtra hsc 12th result 2025 News In Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याचदरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर केले आहेत.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून ४२ हजार ३८८ रिपीटरने नोंदणी केली. ४२ हजार २४ बसले. यापैकी १५ हजार ८२३ पास झाले. एकूण उत्तीर्ण ३७.५४ टक्के निकाल लागला आहे. ७ हजार ३१० दिव्यांग विद्यार्थी नोंदणी. ७ हजार २५८ विद्यार्थी परीक्षेला बसले. ६ हजार ७०५ पास झाले. निकाल टक्केवारी ९२.३८ टक्के इतकी आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. . विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीचा निकाल MSBSHSE वेबसाइट mahahsscboard.in आणि mahresult.nic.in, results.digilocker.gov.in आणि hscresult.mkcl.org वर भेट देऊन पाहू शकतात. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीत ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल तपासण्याची लिंक बोर्डाच्या वेबसाइटवर दुपारी १ वाजता सक्रिय केली जाईल.
महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली. २०२४ मध्ये महाराष्ट्र बारावीचा निकाल (MSBSHSE HSC Result) उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.३७ टक्के होती. गेल्या वर्षीच्या प्रवाहनिहाय निकालांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्र बोर्डाचा बारावी विज्ञानाचा निकाल ९७.८२ टक्के लागला. महाराष्ट्र बारावी कला परीक्षेचा निकाल ८४.८८%, महाराष्ट्र बोर्ड बारावी वाणिज्य परीक्षेचा निकाल ९२.१८%, आयटीआय परीक्षेचा निकाल ९३.३७% लागला. यावर्षी बोर्डाच्या परीक्षा पूर्वीपेक्षा लवकर सुरू झाल्या. पूर्वी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत असत परंतु यावर्षी महाराष्ट्र बोर्डाने ११ फेब्रुवारीपासूनच त्या सुरू केल्या असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
तसेच बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचा अर्थ या विषयांमध्ये परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच, १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के होता. यावर्षी तो ९१.८८ टक्क्यांवर आला आहे.