मोठी बातमी! मराठी भाषेबाबात सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये....
महाराष्ट्र निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या (23 नोव्हेंबर) निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मतदानानंतर राज्यातील नव्हे तर इतर राज्यातील अनेक संस्थानीही एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. यातील अनेकांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीही सरकार स्थापनेचा दावा करू शकते, असे अंदाज वर्तवले आहेत. त्यातच अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षांच्या उमेदवारांही अलर्ट मोडवर आले आहेत. त्यामुळे महायुतीची खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची धाकधूक वाढल्याचे दिसत आहे. त्यातच महायुतीला बहुमताचा 145 चा जादुई आकडा गाठता आला नाही तर त्यांचे सरकार कसे स्थापन होणार, असाही प्रश्न भाजप नेत्यांना पडला. त्यामुळे भाजपने प्लॅन बी ची तयारी केली आहे.
महाराष्ट्र निवडणुकीच्य निकालात महायुती 145 चा जादुई आकडा गाठू शकली नाही तर महायुती राज्यातील इतर लहान घटक पक्षांना सोबत आणण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केला आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी छोट्या पक्षांशी आणि स्वतंत्र लढणाऱ्या उमेदवारांशी बोलणी सुरू केला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास या छोट्या आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन महायुती राज्यात सत्ता स्थापन करेल. विशेष म्हणजे अशा पक्षांनी महायुतीला पाठिंबा दिल्यास घटक पक्षांना सत्तेत वाटा दिला जाईल, असे आश्वासही महायुतीकडून देण्यात आले आहे.
अपक्षांना गळाला लावण्यासाठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन; ‘या’ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी
महाविकास आघाडीसोबत नसलेल्या आणि स्वतंत्रपणे लढलेल्या घटक पक्षांना आता एकत्र आणण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती या पक्षांचा समावेश आहे. महायुती या छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, महाविकास आघाडीचाही एक्झिट पोलवर विश्वास नसल्याने त्यांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीतही बैठकांची फेऱ्या सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही पार पडली. महाविकास आघाडीने बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. जे उमेदवार खात्रीशीर रित्या विजयी होतील, अशा उमेदवारांशी संपर्क साधण्यास महाविकास आघाडीने संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर असेल.
एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर महायुतीचे सरकार सहज स्थापन होऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यावर अद्यापही सस्पेन्स आहे. एक्झिट पोलमध्ये, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यासाठी लोकांना त्यांच्या आवडत्या उमेदवाराचे नाव विचारण्यात आले, तेव्हा 31 टक्के लोकांनी मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी एकनाथ शिंदे यांना पहिली पसंती असल्याचे सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांची 12 टक्के लोकांनी आणि उद्धव ठाकरे यांची 18 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.
Next CM of Maharashtra: सरकार कुणाचही बनो! ‘या’ सहा जणांपैकीच कुणीतरी एकच होणार मुख्यमंत्री
महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि विरोधी एमव्हीए आघाडी यांच्यातच लढत आहे. महाआघाडीत भाजपने 149 जागांवर, शिवसेना (शिंदे) 81 जागांवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 59 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर, महाविकास आघाडी (MVA) मध्ये काँग्रेस 101, शिवसेना (UBT) 95 आणि NCP (SP) 86 जागांवर निवडणूक लढवत आहे.