मुंबईत कबूतरांच्या आहारावर बंदी प्रकरणी मंगल प्रभात लोढाचे आयुक्तांना पत्र
Mumbai News: मुंबई शहरात कबुतरांना आहार देण्यावर आता कठोर निर्बंध आणि कायदेशीर कारवाई लागू आहे. मोकळ्या ठिकाणी त्यांना दाणे टाकणाऱ्यांना ₹५०० दंड ठोठावला जाणार असून कोर्टाने FIR दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्राणी प्रेमी आणि पक्षीप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले.
लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या पत्रात काही सुचनादेखील मांडल्या आहेत.
Shibu Soren passes away: मोठी बातमी! झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने नुकतेच जारी केलेल्या आदेशानुसार, आरोग्यधोका टाळण्यासाठी ही बंदी लागू केली असून, उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या आदेशानुसार दादरमधील प्रसिद्ध कबूतरखानाही बंद करण्यात आला आहे. तेथे ताडपत्री टाकून कबुतरांना खाद्य देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र या बंदीला काही नागरिक आणि पक्षीप्रेमींकडून विरोध होत आहे.
Share Market Today: गिफ्ट निफ्टी आणि सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडणार! शेअर बाजार तज्ञांनी केली
कबूतरखाने सुरू ठेवावेत, या मागणीसाठी जैन समाजाने रॅली काढली. तसेच, राज्याचे मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जनभावनेची आणि साधू-संत, पक्षीप्रेमींच्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी खाद्याअभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेण्याचीही मागणी केली आहे. आरे कॉलनी, बीकेसी, रेस कोर्स अशा मोकळ्या जागांचा पर्याय सुचवत त्यांनी सुवर्णमध्य काढण्याचे आवाहनही केलं आहे.