संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी जालन्याच्या आंतरवाली सराटीत एक बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी सरकार अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र आहे.
सरकारच्या एक शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांचा समावेश होता. तथापि, तुम्ही जे लिहून देतात, बोलता त्याप्रमाणे काम करत नाही, असा सवाल त्यांनी शिष्टमंडळाला विचारला. शिष्टमंडळाने माध्यमांसमोर मराठा आरक्षण आणि इतर विषयावर चर्चा केली. त्यावेळी जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त व्यक्त केली. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
चर्चा कशी करणार?
अंतरवाली सराटीच्या घटनेतील मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे सरसकट मागे घेऊ. आता तीन महिने झाले तरी गुन्हे मागे घेतले नाहीत. आम्ही काय चूक केली, तुमचा शब्द आम्ही मोडला नाही, मात्र आमचा एक-एक माणसाला तुम्ही अटक करत आहेत. कितीतरी लोकांना नोटीसही गेली आहे. असं असताना तुमच्याशी चर्चा कशी करायची?, असा सवाल उपस्थित केला.