सौजन्य - सोशल मिडीया
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली, सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. या भेटीत काय चर्चा झाली हेदेखील जरांगे यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
काय चर्चा झाली धनंजय मुंडेंशी?
आमची आरक्षणावर चर्चा झालीच. मला आरक्षणाशिवाय दुसरं काही नाही. समोरच्याचं वेगळंच असतं आणि माझं वेगळंच असतं. मी झोपेत होतो आणि ते आले तीन वाजले असतील अंदाजे. 20 एक मिनिट चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमची चर्चा झाली, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
इथे कोणीही येऊ शकतं तो आमचा पाहुणा आहे. मला इथे मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते. मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा कोणत्या महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा आहे. शंभुराज देसाई यांनी कुणबींना सहा महिने व्हॅलेडीटीची वाढ दिली आहे. बैठक परळीत आहे आणि ती ताकतीने होणार आहे. मी जातीवादी नाही. तसं कृषिमंत्र्यांनी चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं, तर कौतुक का करू नये, असं जरांगे म्हणाले.
निवडणुक लढविण्याबाबत जरांगे काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही. त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार आहोत. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असं एक मोठा आमदार बोलू लागलेला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी कागदपत्र अगोदरच काढून ठेवा. भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाहीत. जातीच्या आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलू शकत नाही. आंदोलनात किती येतील याची संख्या कधीच मोजायची नसते. गाव स्तरावर खालच्या स्तरावर मी कधी जातीवाद करत नाही. मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघालेला आहे तू पक्षाच्या बाजूने बोलत नाही, असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय.