मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर-मुंबई दुरंतो, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेससह इतर अनेक मार्गांवरील रेल्वेगाड्या रद्द (Trains Cancelled) करण्यात आल्या आहेत. या रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांमध्ये गाडी क्र.17618 अप, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस ही गाडी 31 मे आणि 1 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र.22224 अप, साईनगर शिर्डी-मुंबई वन्दे भारत एक्सप्रेस 31 मे आणि 1 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय, गाडी क्र.17617 डाऊन, मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस 1 आणि 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
तसेच गाडी क्र. 22223 डाऊन, मुंबई-साईनगर शिर्डी वन्दे भारत एक्सप्रेस 1 आणि 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र.11011 डाऊन, मुंबई-धुळे डेली एक्सप्रेस 1 आणि 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
इतर रद्द झालेल्या गाड्या खालीलप्रमाणे :






