• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Add Main Events Date 04 April

Top Marathi News Today: गर्भवती महिलेचे मृत्यप्रकरण; पतित पावन संघटनेनं रुग्णालयाला काळं फासलं

Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 04, 2025 | 06:42 PM
Top Marathi News Today Live:

(फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates : संसदीय अधिवेशनामध्ये वक्फ बोर्ड सुधारण विधेयक सादर करण्यात आले. लोकसभेमध्ये मध्यरात्री हे विधेयक पारित झाले. यानंतर काल (दि.03) राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक सादर करण्यात आले होते. दीर्घ चर्चेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. वक्फ बोर्ड विधेयकाला राज्यसभेमध्ये बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. यामुळे राज्यसभेमध्ये देखील वक्फ बोर्ड विधेयक पारित झाले आहे.

The liveblog has ended.
  • 04 Apr 2025 06:00 PM (IST)

    04 Apr 2025 06:00 PM (IST)

    घरगुती वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून

    वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मावळमध्ये मागील चार दिवसांमध्ये दुसरा खून झाला आहे. घरगुती वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.4) घडली.  दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम येथे घडली.

  • 04 Apr 2025 05:50 PM (IST)

    04 Apr 2025 05:50 PM (IST)

    मंगेशकर हॉस्पिटलला एक रुपया नाममात्र भाडे

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांची मागणी केल्यामुळे गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला असून महायुतीचा शासन निर्णय थेट दाखवला आहे. यामध्ये या रुग्णालयाला केवळ 1 रुपया नाममात्र भाडे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.

    दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला वार्षिक एक रुपया नाममात्र भाड्याने जमीन देण्याचा निर्णय... ! pic.twitter.com/cCnYmuHIcc

    — SushmaTai Andhare (@andharesushama) April 4, 2025

  • 04 Apr 2025 05:34 PM (IST)

    04 Apr 2025 05:34 PM (IST)

    अतिशय असंवेदनशीलतेने हे...; काय म्हणाले मुख्यमंत्री?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “पुण्याच्या मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असंवेदनशीलतेचा परिचय आपल्याला पहायल मिळत आहे. ज्या प्रकारे तेथील डॉक्टर्सनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसुतीला आलेल्या महिलेला अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. अधिकचे पैसे मागितले असा हा संपूर्ण विषय आहे.” असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

  • 04 Apr 2025 05:05 PM (IST)

    04 Apr 2025 05:05 PM (IST)

    दीनानाथ मंगेशकर महिला मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर महिला मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
    धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी…

    — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 4, 2025

  • 04 Apr 2025 04:59 PM (IST)

    04 Apr 2025 04:59 PM (IST)

    पंतप्रधान मोदींची वक्फ सुधारित विधेयकावर प्रतिक्रिया

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, "गेल्या अनेक दशकांपासून, वक्फ व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे. यामुळे आपल्या मुस्लिम माता-भगिनी, गरीब आणि पसमंडा मुस्लिम बंधू-भगिनींच्या हिताचे मोठे नुकसान होत होते. आता संसदेने मंजूर केलेले विधेयक पारदर्शकता वाढविण्यास तसेच लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास मदत करेल," अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

    इसके साथ ही हम एक ऐसे युग में प्रवेश करेंगे, जो आज के समय के अनुरूप होने के साथ ही सामाजिक न्याय को लेकर प्रतिबद्ध होगा। देश के हर नागरिक की गरिमा को प्राथमिकता मिले, इसके लिए हम संकल्पबद्ध हैं। यह मार्ग ज्यादा सशक्त, समावेशी और संवेदनशील भारत के निर्माण में काफी महत्वपूर्ण होने…

    — Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025

  • 04 Apr 2025 04:13 PM (IST)

    04 Apr 2025 04:13 PM (IST)

    वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार सुरु

    नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे. अनेकांनी यामध्ये आपल्या समस्या मांडल्या आहेत.

    NAVI MUMBAI | नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात #navimumbai #maharashtra #marathinews pic.twitter.com/uMkGAvK81a

    — Navarashtra (@navarashtra) April 4, 2025

  • 04 Apr 2025 04:10 PM (IST)

    04 Apr 2025 04:10 PM (IST)

    शिंदेंनी लोकार्पण केलेली रुग्णवाहिका फोडली

    ठाण्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीमधून घेण्यात आलेली रुग्णवाहिका फोडण्यात आली आहे. लोकार्पण केलेली रुग्णवाहिका अज्ञातांनी फोडली आहे. दिवा शहरात ही घटना घडली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे.

    Thane | लोकार्पण केलेली रुग्णवाहिका अज्ञातांनी फोडली, दिवा शहरातील घटना#thane #maharashtra #MarathiNews pic.twitter.com/rGVhoCj0E1

    — Navarashtra (@navarashtra) April 4, 2025

  • 04 Apr 2025 04:08 PM (IST)

    04 Apr 2025 04:08 PM (IST)

    दीनानाथ मंगेशकर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर अजित पवार म्हणाले की," आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत," अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

    पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः…

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 4, 2025

  • 04 Apr 2025 04:01 PM (IST)

    04 Apr 2025 04:01 PM (IST)

     पुण्यातून कुणाल कामराला जशास तसे उत्तर

     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कामराच्याच शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ अशा शब्दांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला  आहे.

  • 04 Apr 2025 04:00 PM (IST)

    04 Apr 2025 04:00 PM (IST)

    मग हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही? आदित्य ठाकरेंचा सवाल

    आदित्य ठाकरे म्हणाले की, “वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या नेत्यांनी भाषण केली की यामधून गरीब मुस्लिम लोकांना मदत होणार. मग हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही. बिल वाचलं तर हिंदूंना काय फायदा होणार हे भाजपने सांगावं,” असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर

  • 04 Apr 2025 03:29 PM (IST)

    04 Apr 2025 03:29 PM (IST)

    मुंबईचा राजा घडवणारे मूर्तिकार गजानन देऊ तोंडवळकर यांचे निधन

    बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष मूर्तिकार गजानन तोंडवळकर उर्फ अण्णा तोंडवळकर यांचे दीर्घ आजाराने मालवण तालुक्यातील पेंडुर या गावी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मुलगा निलेश, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  • 04 Apr 2025 03:03 PM (IST)

    04 Apr 2025 03:03 PM (IST)

    अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट

    ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही भेट ईदसाठी असून यामध्ये कोणताही राजकीय विषय नसल्याचे मत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर 

  • 04 Apr 2025 02:52 PM (IST)

    04 Apr 2025 02:52 PM (IST)

    तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम

    हल्ली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वयोगटातील मुलांना मोबाईल पाहण्याचे व्यसन लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे हल्ली लोकांसाठी एक गरज बनली आहे. सर्वचजण त्यांच्या दिवसातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवतात. यामध्ये रिल्स स्क्रोल करणं, फोटो अपलोड करण यांसारख्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. पण तासंतास सोशल मीडियावर घालवणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरत आहे.

    वाचा सविस्तर-

    तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम, अंधत्व येण्याची देखील शक्यता! तज्ज्ञांनी जारी केला इशारा

  • 04 Apr 2025 02:31 PM (IST)

    04 Apr 2025 02:31 PM (IST)

    मंगेशकर रुग्णालयाच्या PRO यांनी मांडली बाजू

    "या प्रकरणाचा पूर्ण अहवाल आम्ही शासनाकडे पाठवला आहे. प्रोसेस चालू आहे. शासनाला हवी असलेली माहिती दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही. हा विषय पूर्ण गुंतागुंतीचा आहे, शासनाला माहिती दिल्यानंतर पूर्ण माहिती माध्यमांना देण्यात येईल." असे स्पष्ट मत दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी मांडले आहे.

  • 04 Apr 2025 02:30 PM (IST)

    04 Apr 2025 02:30 PM (IST)

    पु्ण्यात इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरमध्ये आग

    सकाळी आठ वाजता बोपोडी चौकालगत कुंदन रेसिडन्सी येथे पहिल्या मजल्यावर "बजाज इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटर" मध्ये आगीची घटना घडली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणत धोका दूर करण्यात आला आहे. यामध्ये कोणीही जखमी कोणी नसून आगीमध्ये दुरुस्तीकरिता आलेले मिक्सर, हिटर, ओव्हन व इतर साहित्य जळाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

  • 04 Apr 2025 01:51 PM (IST)

    04 Apr 2025 01:51 PM (IST)

    जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही - बावनकुळे

    दीनानाथ रुग्णालयातील घटनेवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आंदोलन करणं अधिकार आहे. सरकार रुग्णालयावर कारवाई करेल. नेमकी काय चूक झाली आहे सरकार तपासणार आहे. सर्व सामान्य नागरिकांचा उपचार घेणे अधिकार आहे जबाबदार व्यक्तीला आम्ही सोडणार नाही," असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

  • 04 Apr 2025 01:49 PM (IST)

    04 Apr 2025 01:49 PM (IST)

    दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या घटनेवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची प्रतिक्रिया

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. "यासंबंधी आम्ही नोंद घेतली आहे. उचित कारवाई करणार आहोत. भाडेतत्वावर कुणालाही जमीन देताना काही अटी असतात त्या अति शर्थी बघून निर्णय घेऊ. कडक कारवाई करणं आवश्यक आहे. रिपोर्ट आल्यानंतर कळेल नेमकं काय घडलं होतं. चूक कोणाची आहे? हे नेमकं रिपोर्ट आल्यानंतर कळेल. दोन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितलं आहे. केस पेपर आम्ही बघणार आहोत," अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

  • 04 Apr 2025 01:40 PM (IST)

    04 Apr 2025 01:40 PM (IST)

    गर्भवती महिलेचे मृत्यप्रकरण; पतित पावन संघटनेनं रुग्णालयाला काळं फासलं

    गर्भवती महिलेच्या मृत्यनंतर मंगेशकर रुग्णालयाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूनंतर शिवसेना पक्ष आणि अनेक संघटनाही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिवसैनिकांनी रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकली. तर, पतित पावन संघटनेनं रुग्णालयाला काळं फासलं.तसेच मंगेशकर रुग्णालयाला पालिकेनं नोटीसही बजावली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.

  • 04 Apr 2025 12:31 PM (IST)

    04 Apr 2025 12:31 PM (IST)

    ट्रम्प यांच ‘ते’ वक्तव्य आणि फार्मा शेअर्समध्ये मोठी घसरण

    शुक्रवारी निफ्टी फार्मा निर्देशांकात ६% ची मोठी घसरण झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर ही घसरण झाली, ज्यामध्ये त्यांनी औषध क्षेत्रासाठी वेगळे शुल्क लादण्याबद्दल बोलले होते. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, औषध उत्पादनांवर अभूतपूर्व दर लादले जातील. ते म्हणाले, “आम्ही औषधांना वेगळ्या श्रेणीत ठेवत आहोत. याबद्दल लवकरच घोषणा केली जाईल.”

  • 04 Apr 2025 12:30 PM (IST)

    04 Apr 2025 12:30 PM (IST)

    रुग्णालयाची बेफिकरी अन् गर्भवतीचा मृत्यू; शिंदेंच्या शिवसैनिकांचा संताप

    पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही प्रशासन महिलेला दाखल करण्यास तयार नव्हते.

  • 04 Apr 2025 11:55 AM (IST)

    04 Apr 2025 11:55 AM (IST)

    वॉल स्ट्रीटवर भूकंप, देशांतर्गत शेअर बाजार झाला लाल

    ट्रम्प टॅरिफमुळे वॉल स्ट्रीटमध्ये झालेल्या गोंधळानंतर, देशांतर्गत शेअर बाजाराचा दलाल स्ट्रीट देखील लाल झाला आहे. ७५४८८ च्या पातळीवर पोहोचल्यानंतर, सेन्सेक्स सध्या ८१७ अंकांनी घसरून ७५,४७७ वर आहे. त्याच वेळी, निफ्टीने आता घसरणीचा तिहेरी शतकाचा टप्पा ओलांडला आहे आणि तो 306 अंकांनी घसरून 22943 वर पोहोचला आहे.

  • 04 Apr 2025 11:55 AM (IST)

    04 Apr 2025 11:55 AM (IST)

    एसटीचे जाहिरातीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे

    एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

  • 04 Apr 2025 11:54 AM (IST)

    04 Apr 2025 11:54 AM (IST)

    मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव

    दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. विकास जिंदाल यांच्या म्हणण्यानुसार, विघटित यकृत सिरोसिस हा यकृताच्या आजाराचा एक टप्पा आहे. ज्यामध्ये दीर्घकालीन आजारामुळे (सिरोसिस) नुकसान झालेले यकृत त्याचे आवश्यक कार्य प्रभावीपणे करू शकत नाही. कॉम्पेन्सेड सिरोसिसच्या विपरीत, ज्यामध्ये अवयव भरपाई करण्यात अयशस्वी होतात तेव्हा विघटन होते, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होते. हे बहुतेकदा हिपॅटायटीस, जास्त मद्यपान किंवा फॅटी लिव्हर रोग यासारख्या दीर्घकालीन परिस्थितींचा परिणाम असू शकतो.

  • 04 Apr 2025 11:48 AM (IST)

    04 Apr 2025 11:48 AM (IST)

    घोडनदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु

    श्री क्षेत्र वडगाव काशीबेग व चिंचोडी देशपांडे (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रातून मागील तीन महिन्यापासून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. कोट्‌यावधी रुपये किमतीच्या वाळूची चोरी झाली असून प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. ही दोन्ही गावे वाळूचोरी व मुरमचोरीचा अड्डा बनली आहेत.

  • 04 Apr 2025 11:48 AM (IST)

    04 Apr 2025 11:48 AM (IST)

    रसायनयुक्त पाण्याने इंद्रायणी नदी फेसाळली

    इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. नदीच्या बंधाऱ्यावर फेसाचे मोठे लोट दिसून येत आहे. रसायन युक्त पाणी सोडल्यामुळे नदी फेसाळली आहे. नदीकाढी असणाऱ्या कंपन्यामधून सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदी प्रदुषित करत आहेत.

  • 04 Apr 2025 11:46 AM (IST)

    04 Apr 2025 11:46 AM (IST)

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गृर्भवती महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयामध्ये पैशांची अधिक मागणी केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसेना  आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 10 लाख भरुन देखील उपचार करण्यात दिरंगाई केल्यामुळे निष्पाप महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

  • 04 Apr 2025 11:15 AM (IST)

    04 Apr 2025 11:15 AM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी सरकारकडून जय्यत तयारी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह बैठक पार पडली. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले

  • 04 Apr 2025 11:00 AM (IST)

    04 Apr 2025 11:00 AM (IST)

    ‘एक राज्य एक गणवेश’ योजना गुंडाळली’; काय आहे शासन निर्णय

    अवघ्या एका वर्षात राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना बासनात गेली आहे. आता गणवेश खरेदी आणि रंग निश्चितीचे अधिकार पुन्हा एकदा गावपातळीवरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दि‌. २ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०२५) झेडपी शाळांमधील गणवेशासाठी कापड खरेदी आणि रंग निश्चिती ची कामे आता शालेय व्यवस्थापन समित्या करणार आहेत

  • 04 Apr 2025 10:59 AM (IST)

    04 Apr 2025 10:59 AM (IST)

    कराडनंतर खोक्या भोसलेलाही तुरूंगात मारहाण; फोटो व्हायरल

    बीड:बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ ‘खोका’ याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी वन विभागाने त्याला ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्याला कोठडीत ठेवण्यात आले. या दरम्यान त्याच्यावर मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भोसलेच्या पाठीवर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसणारे काही फोटो सध्या समोर आले असून, ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत

  • 04 Apr 2025 10:48 AM (IST)

    04 Apr 2025 10:48 AM (IST)

    अवकाळी पावसात पुण्यात झाडपडीने मोठे नुकसान

    काल पुण्यात वरुणराजाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रात्री हडपसर, वैदुवाडी याठिकाणी पाऊसवारा यामुळे एका घराचे टेरेसचे लोखंडी एँगल, पत्रा असलेले 20/30 फूट छत उडून लांब असलेल्या पत्र्याच्या घरावर लटकलेल्या अवस्थेत होते. जवानांनी छत काढले असून कोणीही जखमी झाले नाही. झाडपडीच्या देखील अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत.

  • 04 Apr 2025 10:45 AM (IST)

    04 Apr 2025 10:45 AM (IST)

    नांदेडमध्ये कामगार महिलांचा ट्रक विहिरीत कोसळला

    नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. यामुळे तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. हळद काढणीसाठी जाणाऱ्या महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अद्याप बचावकार्य सुरु आहे.

  • 04 Apr 2025 10:43 AM (IST)

    04 Apr 2025 10:43 AM (IST)

    हिंमत असेल तर डॉक्टरांवर कारवाई करावी - राऊत

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महिलेचा प्रसुतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन आता राजकीय नेत्यांनी देखील टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी हिंमत असेल तर प्रशासनाने डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्या महिलेचे सरकारला शाप लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे.

  • 04 Apr 2025 10:40 AM (IST)

    04 Apr 2025 10:40 AM (IST)

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पोलिसांकडून चौकशी

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. जुळ्या मुलांना जन्म दिलेल्या या आईचा रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि पैशांची मागणी यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून आज रुग्णालयामध्ये चौकशी केली जाणार आहे.

  • 04 Apr 2025 10:40 AM (IST)

    04 Apr 2025 10:40 AM (IST)

    काय आहेत सोन्याचे भाव? किंमती वाढल्या की कमी झाल्या?

    4 एप्रिल रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,339 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,561 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,005 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 85,610 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 70,050 रुपये आहे. 4 एप्रिल रोजी आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम 102.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,02,900 रुपये आहे.

  • 04 Apr 2025 10:39 AM (IST)

    04 Apr 2025 10:39 AM (IST)

    Lava Bold 5G स्मार्टफोन भारतात लाँच

    स्मार्टफोन कंपनी Lava ने त्यांचा नवीन सुपर स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन 5G व्हेरिअंट आहे. नवीन स्मार्टफोन भारतात Lava Bold 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये IP64-रेटेड बिल्ड आणि 64-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा युनिट आहे. यात फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Lava Bold 5G पुढील आठवड्यात अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 04 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra politics news today
  • Waqf Board Amendment Bill

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विक्रान इंजिनिअरिंगचा ७७२ कोटी रुपयांचा IPO २६ ऑगस्ट रोजी होणार लाँच, GMP १२ टक्क्यांपेक्षा जास्त

विक्रान इंजिनिअरिंगचा ७७२ कोटी रुपयांचा IPO २६ ऑगस्ट रोजी होणार लाँच, GMP १२ टक्क्यांपेक्षा जास्त

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा, कमी बजेटमध्ये खरेदी करा सुंदर दागिने

रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा, कमी बजेटमध्ये खरेदी करा सुंदर दागिने

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

व्हिडिओ

पुढे बघा
NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.