Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : राज्य सरकारकड़ून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे कर्जाची पूर्ण रक्कम परत करावी लागणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामध्ये आता प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक मधील निवास्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे.
10 Apr 2025 05:19 PM (IST)
आपण सर्वजण भगवान महावीरांना नमन करु. ज्यांनी नेहमीच अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर दिला. त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात. त्यांच्या शिकवणी जैन समुदायाने सुंदरपणे जतन केल्या आहेत आणि लोकप्रिय केल्या आहेत. भगवान महावीर यांच्या प्रेरणेने, त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सामाजिक कल्याणात योगदान दिले आहे.भगवान महावीर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार नेहमीच काम करेल. गेल्या वर्षी, आम्ही प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला, ज्या निर्णयाचे खूप कौतुक झाले.
We all bow to Bhagwan Mahavir, who always emphasised on non-violence, truth and compassion. His ideals give strength to countless people all around the world. His teachings have been beautifully preserved and popularised by the Jain community. Inspired by Bhagwan Mahavir, they… pic.twitter.com/BRXIFNm9PW
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2025
10 Apr 2025 04:50 PM (IST)
देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महावीर जयंतीनिमित्त चैतन्यमयी वातावरण आहे. भिवंडीत देखील महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
BHIWANDI | भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी | Navarashtra#Bhiwandi #MahavirJayanti #MarathiNews pic.twitter.com/xogz3Sm22l
— Navarashtra (@navarashtra) April 10, 2025
10 Apr 2025 04:29 PM (IST)
"आज जर आतंकवादी राणाला आणत असतील तर दाऊदला का आणले नाही? वर्ष गायकवाड बोलल्यात. ती हिम्मत का दाखवत नाही. या बॉम्बस्फोट मागे कोण होतं हे सर्वांना माहीत आहे. जबाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला आणावे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणून राजकारण करू नये," असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
10 Apr 2025 03:52 PM (IST)
पुण्यात नव्याने उच्चभ्रु परिसरात म्हणून नावारूपाला आलेल्या बाणेर परिसरात 'ओझोकुश' गांजा (हायड्रोफोनीक) पकडण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल साडे पाच लाखांचा हा गांजा पकडला आहे. 26 वर्षीय तरुणाकडे गांजा सापडल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
10 Apr 2025 03:17 PM (IST)
स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पीडितेला राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
10 Apr 2025 03:02 PM (IST)
मुंबई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तव्वहुर राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA च्या पथकाने त्याला अधिकृतपण ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. लवकरच त्याला NIA च्या न्यायालयात दाखल केले जाईल. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे.
10 Apr 2025 02:38 PM (IST)
10 Apr 2025 02:32 PM (IST)
अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यावर कॉंग्रेसमधील नेत्यांनी आक्षेप घेत न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जवळपास 15 ते 16 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्ट आता 16 एप्रिल रोजी यावर सुनावणी घेणार आहे.
10 Apr 2025 01:54 PM (IST)
गुरुवार असल्यामुळे अनेकांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले आहे. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हे देखील साई दर्शनाला गेले आहेत.
SHIRDI | माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री साई दर्शनाला#shirdi #maharashtra #ravishastri #marathinews pic.twitter.com/BsRqpHEsEZ
— Navarashtra (@navarashtra) April 10, 2025
10 Apr 2025 01:53 PM (IST)
प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया हे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी गुरुवारी मंदिरामध्ये जाऊन साईचरणी लीन झाले आहे.
10 Apr 2025 01:48 PM (IST)
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मार्च महिन्यात केवळ ५६ टक्केच वेतन मिळणार आहे. वेतनासाठी महामंडळाकडे निधी नसल्याने कमी वेतन मिळणार असल्याचा दावा कामगार संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी असंतोष निर्माण झाला असून त्यावरून आता राजकारणही तापू लागले आहे.
10 Apr 2025 12:55 PM (IST)
आळंदी शहराच्या नजीक असलेल्या चर्होली खुर्द (ता.खेड) येथील गट नंबर 73 मधील पाच एकर क्षेत्रावर शेतीचे विकसन करून विकण्यात आलेल्या ‘प्लॉटिंग’वर पुणे महानगर प्रदेश विकसन प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएने धडक कारवाई केली आहे.
10 Apr 2025 12:41 PM (IST)
डोंबिवली स्टेशन परिसरात एकच गोंधळ दिसून आला. या भागामध्ये आरटीओची रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संतप्त चालकांनी गोंधळ घातला.
10 Apr 2025 12:39 PM (IST)
लाडक्या बहिणींना सांभाळत आम्ही राहिलेला विकास करणार आहेत असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केले आहे. याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत आहे.
10 Apr 2025 12:38 PM (IST)
खुलताबादच रत्नपुर नाव व्हावं अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. याबाबत शिंदे गटाच्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरुवातीपासूनच बाळासाहेब ठाकरे यांची या दोन्ही नावांबद्दल ठोस भूमिका होती की औरंगाबाद नगर आणि खुलताबाद रत्न पूर व्हावं आता काही लोक फक्त म्हणताय हे आता आलेत पण याआधी आम्ही ही मागणी केली आहे, असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.
10 Apr 2025 12:15 PM (IST)
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाला पुढची तारीख देण्यात आली आहे. येत्या 24 एप्रिल रोजी न्यायालयाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तारीख देण्यात आली आहे.
10 Apr 2025 11:57 AM (IST)
शिधापत्रिकाधारकांना प्रशासनाकडून ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पूर्वी 31 मार्च ही शेवटची तारीख दिली होती. मात्र किराणा दुकानांच्या बाहेर लागलेल्या रांगामुळे ही 'शिधापत्रिका ई-केवायसी'साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ई-केवायसी'साठी ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.
10 Apr 2025 11:54 AM (IST)
एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
10 Apr 2025 11:12 AM (IST)
राज्यातील विकास सोसायट्यांना नियमाप्रमाणे आयकर भरावा लागत नाही, पण त्यांना आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. देशात एक लाख विकास सोसायट्या आहेत, त्यापैकी अनेक विकास सोसायट्यांना आयकर विभागाकाडून आयकर भरण्यासाठी नोटीस आली होती. विकास सोसायट्यांनी सक्षम अधिकाऱ्यांसमोर रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित आयकर लागू होणार नाही, अशी माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
10 Apr 2025 11:11 AM (IST)
येत्या 16 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा आहे. यासाठी संपूर्ण अलंकापूरी सजवली जाणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
10 Apr 2025 10:55 AM (IST)
रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या.मुख्यमंत्री म्हणाले, कर्करोग निदान उपचाराबाबत केंद्राने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण आणले आहे. याच धर्तीवर कर्करोग निदान व उपचारासाठी संदर्भसेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरवण्यात यावी, कर्करोगावर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. वाचा सविस्तर
10 Apr 2025 10:53 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी उन्हाचा कडाका तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने कहर केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे सुमारे 2353.38 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
10 Apr 2025 10:53 AM (IST)
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, शिक्रापूर परिसरात पादचारी महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून, ७ लाख १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
10 Apr 2025 10:52 AM (IST)
कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शक्तीप्रदर्शन मेळावा घेत कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
Raigad | कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन मेळावा !#raigad #maharashtra #Marathinews pic.twitter.com/H3NT2WmkEn
— Navarashtra (@navarashtra) April 10, 2025