चिमूर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या पाहणीत नालीचे बांधकाम असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा अहवाल आवश्यक कार्यवाहीसाठी चिमूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळत आहे. कारण येथील नागरिकांना मातीमिश्रित गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला ता. कारंजा, मोहगव्हाण ता. मंगरुळपीर, आणि जऊळका ता. मालेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिक व पाणी परिस्थितीची पाहणी केली.
नगररचना विभागातील कथित अनियमिततेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य जमीनधारक आणि आदिवासी बांधवांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दर महिन्याला ‘तक्रारदार दरबार’ घेण्याची घोषणा त्यांनी केली.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे बोलताना त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका करत, ‘जखम डोक्याला आणि पट्टी गुडघ्याला’ अशी खोचक…
भिवंडीत गणेशोत्सवा दरम्यान चित्रा वाघ यांनी माजी आमदार नरेंद्र पवार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दोषींवर कारवाई होईल आणि भाजपा कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमध्ये एक असा गणेशोत्सव साजरा केला जातो, जो केवळ धार्मिक पूजा-अर्चा आणि आरतीपुरता मर्यादित नाही. १९५९ मध्ये स्व. गुलाब पुरी यांनी सुरू केलेल्या या परंपरेत देश-विदेशातील राजकीय घडामोडी, महागाई, शिक्षण…
निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. मात्र तरी देखील संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध गावनिहाय राजकीय गटांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
वाघाने सलग हल्ले करून मानवी जीव घेतल्याने शेतकरी व गुराख्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघाच्या हल्ल्यांत मागील महिनाभरात तीन गुराख्यांचा मृत्यू झाला असून, एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
Assam News : आसाममधील दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात संशोधकांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. अत्यंत दुर्मीळ आणि कमी अभ्यास झालेल्या समूहातील परजीवी गांधीलमाशीची नवी प्रजाती येथे आढळून आली असून, तिची…
अहिल्यानगर जिल्ह्यातील चापडगावात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पिके आणि चाऱ्याअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास गावकऱ्यांवर…
मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला आता नवी चालना मिळणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर मुंबईच्या क्रूझ ताफ्यात दुसरे जहाज दाखल होत असून, प्रवाशांना देशांतर्गत तसेच पुढील टप्प्यात आंतरराष्ट्रीय समुद्री सफरीचे पर्याय उपलब्ध होणार…
मंत्र्यांच्या फोटो सेशनचा शेतकऱ्यांना वीट आला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असण्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न करते आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले.
खडसंगी ग्रामपंचायत कार्यालयातून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे मागील खिडकीतून बाहेर नेण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सुट्टीच्या दिवशी घडल्याचे सांगितलं जात आहे.
Matheran News: शार्लोट लेकमधून जवळपास १००० ट्रक गाळ काढण्यात आल्याची नोंद माथेरान नगरपरिषद बांधकाम विभागाकडे आहे. गाळ कुठे ठेवण्यात आला आणि तलाव खरोखर गाळमुक्त झाला का, याबाबत आता प्रश्न उपस्थित…
Thane News : ठाणे रेल्वे स्थानकावर रिक्षा प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस आणि वाद कमी करण्यासाठी राज्यातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली…
९ एकर जमीन नावावर करूनही वृद्ध आई-वडिलांना मुलाकडून त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादानंतर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे सांगितले जात असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल…
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी पिंपळगाव राजा येथे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत.