
Top Marathi News Today Live:
08 Nov 2025 05:35 PM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यामुळे नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे.
08 Nov 2025 05:10 PM (IST)
अहिल्यानगर मधील कोपरगाव परिसरात कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी बाजारभाव पडण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर राहते. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक भूमिका घेत आहेत. समितीचा अहवाल एप्रिलमध्ये आल्यानंतर सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, म्हणजे जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होईल, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला.
08 Nov 2025 03:50 PM (IST)
वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदान 2 डिसेंबर रोजी होणार आहे. तर सोमवार, 10 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असतानाही, प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात आणि वडगाव मावळमधील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
08 Nov 2025 03:45 PM (IST)
भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, टीम इंडियाने मागील काही सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या संघाने स्वत:ला बऱ्याचदा सिद्ध केले आहे. झालेल्या टी20 आशिया कप 2025 मध्ये देखील भारताच्या संघाने एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकली होती. यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला तीन वेळा पराभूत केले होते. जगभरामधील क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणारे सामने पाहायला आवडतात.
08 Nov 2025 03:40 PM (IST)
नवी मुंबईच्या खारघर येथून खंडणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकात्याच्या एका महिलेने तब्बल ₹२४ लाख १७ हजार २८ रुपये इतकी खंडणी उकळल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना खारघर तसेच कोलकत्ता येथील वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीसोबत घडली आहे.पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे.
08 Nov 2025 03:36 PM (IST)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान महायुती एकत्रित लढणार की स्वबळावर याची चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर मंत्री आशीष शेलार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
08 Nov 2025 03:35 PM (IST)
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, एका शतकानंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेट परत येणार आहे. यावेळी २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्येही क्रिकेट या खेळाचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत सहा पुरुष आणि सहा महिला संघ सहभागी होतील. या मेगा इव्हेंटमध्ये पाकिस्तान सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनकडून लॉस एंजेलिस २०२८ च्या खेळांसाठी सहा सहभागी संघांची निवड कशी करावी हे ठरवण्यात आले आहे.
08 Nov 2025 03:30 PM (IST)
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर चहा बिस्कीट किंवा वडापाव, समोसा, शेवपुरी इत्यादी गोष्टी खाल्ल्या जातात. पण कायमच बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, अपचन, ऍसिडिटी होते. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी स्वीट कॉर्न कटलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मक्याचे दाणे लहान मुलांना खूप जास्त आवडतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे उपलब्ध असतात. त्यामुळे मक्याच्या दाण्यांचे कटलेट बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता. चला तर जाणून घेऊया स्वीट कॉर्न कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(
08 Nov 2025 03:25 PM (IST)
जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय लष्कराने या मोहिमेला ‘ऑपरेशन पिंपल’ असे नाव दिले आहे. ७ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
08 Nov 2025 03:20 PM (IST)
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लाडका लेक सोहम बांदेकर देखील मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोहम बांदेकर लग्नामुळे चर्चत आला आहे. सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी येऊन सोहमचा थाटात केळवण साजरा केले. या केळवणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
08 Nov 2025 01:55 PM (IST)
वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहराच्या नावाला काळीमा लागत आहे. काही जण गुन्हेगारी घटनांशी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार करत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित आरोप करुन कृपा करून शहराचे नाव बदनाम करू नका. भाजप गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही’, असे स्प्षट मत राज्याचे तंत्र व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरुन कोणी पोलिसांवर दबाब टाकत असतील, तर त्यांची गय करु नका.
08 Nov 2025 01:46 PM (IST)
सध्या जोरदार चर्चेत असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा…’ हा चित्रपट प्रेम, इमोशन आणि कॉमेडीचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांसमोर आणणार आहे. उत्तम लेखन, अभिनय आणि संगीत असलेला हा पुरेपूर मनोरंजन करणारा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, त्याचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे.
08 Nov 2025 01:40 PM (IST)
अमेरिकेचे नोबेल पुरस्कार विजेते आणि DNA चे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ जेम्स वॉट्सन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विज्ञानातील संशोधन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. वॉट्सन यांना २० व्या शतकातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक संशोधकांपैकी एक म्हणून ओळखले जात असत.
08 Nov 2025 01:35 PM (IST)
किशोरवयीन आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी माध्यमांची भूमिका बळकट करण्यासाठी युनिसेफ इंडियाने आयोजित केलेल्या ‘आरोग्य संपादकांच्या धोरणात्मक सहभागासाठी कार्यशाळा: उदयोन्मुख किशोरवयीन आरोग्य आव्हाने – गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आणि रस्ता सुरक्षा’ या विषयावर दोन दिवसाची राष्ट्रीय ‘ट्रेन ऑफ ट्रेनर्स’ (TOT) कार्यशाळा घेण्यात आली. किशोरवयीन आरोग्य समस्यांबद्दल, विशेषतः Cervical Cancer प्रतिबंध आणि रस्ता सुरक्षा याबद्दल जागरूकता वाढविण्यात माध्यमांनी आपली भूमिका आणखी बळकट करावी असे कार्यशाळेत आवाहन करण्यात आले.
08 Nov 2025 01:25 PM (IST)
जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय लष्कराने या मोहिमेला ‘ऑपरेशन पिंपल’ असे नाव दिले आहे. ७ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
08 Nov 2025 01:15 PM (IST)
स्वप्नस्वरूप प्रस्तुत आणि सचिन आंबात लिखित-दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर नुकताच या चित्रपटाचा चित्तथरारक टीझर प्रदर्शित झाला असून त्याने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यासारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘असुरवन’ हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कमी कालावधीतच ‘असुरवन’ चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
08 Nov 2025 01:11 PM (IST)
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. जमीन व्यवहार प्रकरणात आरोप झाल्यानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्यासाठी दबावही वाढत होता. अखेर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानुसार, अमेडिया कंपनीने जमिनीचे व्यवहार रद्द करण्याची घोषणा करत कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केला.
08 Nov 2025 01:05 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अण्णांनी राळेगणसिद्धी येथे केलेले जलसंधारणाचे उत्कृष्ट काम संपूर्ण देशवासियांसाठी दिशादर्शक आहे. याच ठिकाणी आता बांबू लागवड अभियान हाती घेण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
08 Nov 2025 10:59 AM (IST)
बांगलादेशच्या (Bangladesh) राजकाराणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांनी युनूस यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. हसीना यांनी म्हटले आहे की, युनूस यांनी त्यांच्या सरकारवरील नियंत्रण गमावले आहे. सध्या युनूसच्या राजवटीत कट्टरपंथीं शक्तीं राज करत असल्याचा दावा हसीना यांनी केला आहे.
08 Nov 2025 10:55 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला चार नवीन वंदे भारत गाड्यांची भेट दिली. वाराणसी-खजुराहो, लखनऊ-सहारापूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू मार्गांवर धावणाऱ्या या गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी स्वतः हिरवा झेंडा दाखवून केले. त्यांनी ध्वजारोहण करताच, स्थानकावरील प्रवाशांनी “हर हर महादेव” च्या जयघोषाने उत्सवाचे वातावरण निर्माण केले.
08 Nov 2025 10:48 AM (IST)
Realme भारतात लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव आणि लाँच डेट आधीच जाहीर केली आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Realme GT 8 Pro हा 20 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. Realme चा हा स्मार्टफोन चीनमध्ये गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Realme GT 8 सीरीजचा भाग आहे. कंपनी सुमारे एका महिन्यानंतर आता हा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.
08 Nov 2025 10:42 AM (IST)
बीड जिल्ह्यातून सतत गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. आता बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे कारमधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाईक करत दोंघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
08 Nov 2025 10:33 AM (IST)
गॅब्बाची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना अनुकूल असते. हे उच्च धावसंख्या असलेले मैदान आहे, परंतु वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडा वेग आणि उसळी मिळते. एकदा फलंदाज सुरुवातीच्या कसोटीतून बाहेर पडले की, परिस्थिती सहसा सुधारते. गॅब्बामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना अधिक यश मिळाले आहे. १८० पेक्षा जास्त धावसंख्या हा एक सुरक्षित लक्ष्य मानला जातो.
08 Nov 2025 10:24 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरोधी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासही नकार दिला आहे. याशिवाय ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोपही केले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
08 Nov 2025 10:15 AM (IST)
देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत रेल्वे धावत आहेत. त्यातच नांदेडहून पुण्याला धावणारी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 7 तासांवर येणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२६ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.
08 Nov 2025 10:06 AM (IST)
टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिएॅलिटी शो बिग बॉस 19 सध्या सातत्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या आठवड्यामध्ये टेलिव्हिजन या मुद्द्यावरून अनेक वाद पाहायला मिळाले. टेलिव्हिजनवर काम करणारा गौरव खन्ना याला तु टेलिव्हिजनवर काम करतो पण आम्ही तुला ओळखत नाही यावरून त्याला डिवचन्यात आले होते. यावरून फक्त सलमान खान असून तापलेला नाही तर बाहेर असलेले सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री कलाकार देखील संतापलेले पाहायला मिळाले. अनेक अनेक सोशल मीडियावर या संदर्भात त्यांची मते मांडली होती.
08 Nov 2025 09:59 AM (IST)
नागपूर: नागपूरमधून एक हत्येची थरारक घटना समोर आली आहे. बालपणीचा राग मनात ठेवला आणि त्याच रागातून पुतण्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने काकांची निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. कुणाल कुंभारे असे आरोपीचे नाव आहे. तर डोमा कुंभारे हे काकाचे नाव आहे.
08 Nov 2025 09:52 AM (IST)
भारतात 8 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,201 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,184 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,151 रुपये आहे. भारतात 8 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,010 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,510 रुपये आहे. भारतात 8 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 152.40 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,52,400 रुपये आहे.
08 Nov 2025 09:47 AM (IST)
Maharashtra Rain alert: राज्यात हळूहळू थंडीचा प्रारंभ झाला असून, पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात घट होत आहे.
08 Nov 2025 09:42 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५वा टी२० सामना विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्क्सवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल, जो भारतीय चाहते वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुभवू शकतील. तुम्ही JioHotstar वर IND विरुद्ध AUS 5 व्या T20I चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना डीडी स्पोर्ट्सवर पूर्णपणे मोफत पाहू शकता.
08 Nov 2025 09:32 AM (IST)
मुरुड जंजिरा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे व खराब हवामानामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. हा किल्ला काही दिवस बंद होता. त्यामुळे पर्यटकांना किल्ला दर्शन न होताच परतावे लागत होते. परिणामी, पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र, आता हवामान पूवर्वत झाल्याने जंजिरा दर्शनासाठी किल्ल्यावर जाणे शक्य झाले आहे.
08 Nov 2025 09:21 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना सुरुवात केली जात आहे. त्यातच भारतात ‘वंदे भारत’ रेल्वे पसंतीस उतरली आहे. अनेक मार्गांवर या गाड्या धावत आहेत. असे असताना आज काशीमधून चार ‘वंदे भारत’ गाड्या सुटणार आहेत. याला पंतप्रधान मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. मुख्यमंत्री योगी त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती दिली जात आहे.
08 Nov 2025 09:00 AM (IST)
बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जहानारा आलम हिने माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सध्या मानसिक आरोग्याच्या कारणास्तव संघाबाहेर असलेली जहानारा हिने सांगितले की, २०२२ महिला वनडे विश्वचषकादरम्यान राष्ट्रीय संघ व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांकडून तिला अशोभनीय प्रस्ताव देण्यात आले होते. हे प्रस्ताव तिने नाकारल्यानंतर मंजुरुल इस्लाम यांनी तिच्या कारकिर्दीत अडथळे आणण्यास सुरुवात केल्याचा तीचा आरोप आहे.
08 Nov 2025 08:55 AM (IST)
भारतीय फुटबॉल विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू रायन विल्यम्स यांनी अधिकृतपणे भारतीय नागरिकत्व स्वीकारले असून, त्यामुळे ते आता भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत. बेंगळुरू एफसी संघातील त्यांच्या सहकारी आणि भारतीय फुटबॉलचे आयकॉन सुनील छेत्री यांच्या हस्ते विल्यम्स यांना भारतीय पासपोर्ट प्रदान करण्यात आला. या सोहळ्याने भारतीय फुटबॉलमध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
08 Nov 2025 08:50 AM (IST)
देशातील सार्वजनिक, खासगी आणि सहकारी बँकांकडून बँकिंग कायदे व नियमांचे पालन केले जात आहे की नाही, यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सतत लक्ष ठेवते. बँकांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यास ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आरबीआयकडून आवश्यक ती पावले उचलली जातात. आरबीआयने ७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्रातील द पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुसद या बँकेवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, श्री गुरु राघवेंद्र सहकारा बँक नियामिथा, बंगळुरू या बँकेवर पूर्वी घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.
08 Nov 2025 08:45 AM (IST)
तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील केलामंगलम येथे आईनेच आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची समलिंगी पार्टनरच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. बाळाच्या मृत्यूबाबत वडिलांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान उघड झाले की, आईनेच आपल्या पार्टनरसह कट रचून बाळाचा जीव घेतला होता. पोलिसांनी दोघींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
08 Nov 2025 08:42 AM (IST)
पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. “या प्रकरणात दोन्ही पक्षांनी रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यामुळे दाखल झालेले गुन्हेगारी प्रकरण संपणार नाही. तपासात जे काही अनियमितता आढळतील, त्यावर निश्चितच कारवाई होईल,” असे फडणवीस म्हणाले. “या मताशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत आहेत. त्यामुळे अहवालात दोषी ठरलेल्यांवर कारवाई अपरिहार्य आहे,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
08 Nov 2025 08:40 AM (IST)
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्रे आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पुढील तीन वर्षांसाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन कृषी क्षेत्राला तांत्रिक आणि आर्थिक बळकटी मिळणार आहे.
Marathi Breaking news updates : राज्यात हळूहळू थंडीचा प्रारंभ झाला असून, पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात घट होत आहे.
खानदेशासह राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमान १४ अंशांच्या खाली आल्याने गारठा जाणवू लागला आहे. तथापि, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन चक्रीवादळामुळे पुढील २४ तास हवामानातील घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.