Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

Marathi breaking live marathi- भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ वृत्त नाही. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:०९ वाजता भूकंप झाला. बझांग जिल्ह्यातील माउंट सैपाल हे भूकंपाचे केंद्र होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 01, 2025 | 06:02 PM
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates-  भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रविवारी (30 नोव्हेंबर) नेपाळच्या सुदूर पश्चिम प्रांत बझांगमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे लोक भीतीने घराबाहेर पडले होते. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेली नाही.

 

 

 

 

 

The liveblog has ended.
  • 01 Dec 2025 05:50 PM (IST)

    01 Dec 2025 05:50 PM (IST)

    9400 तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍यासाठी ‘दोस्‍त सेल्‍स’ उपक्रमाचा विस्‍तार

    भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आपल्या प्रमुख सॅमसंग डिजिटल अ‍ॅण्ड ऑफलाइन स्किल्स ट्रेनिंग (दोस्त) सेल्स प्रोग्रामचा मोठा विस्तार जाहीर केला आहे. या विस्तारित उपक्रमांतर्गत वंचित समुदायांतील तब्बल 9,400 तरुणांना आधुनिक रिटेल क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • 01 Dec 2025 05:08 PM (IST)

    01 Dec 2025 05:08 PM (IST)

    आज बँक ऑफ बडोदामध्ये 2700 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख

    सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) मध्ये २,७०० अप्रेंटिस पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी विंडो १ डिसेंबर २०२५ रोजी बंद होईल. उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी आता खूप कमी वेळ शिल्लक आहे. बँकेने अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. जी bankofbaroda.bank.in आणि BFSI सेक्टर स्किल कौन्सिल पोर्टल, bfsissc.com द्वारे पूर्ण करता येणार आहे. या भरतीमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये अप्रेंटिस पदे भरण्यासाठी तरुणांना संधी उपलब्ध होतील. कोणत्याही तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी बँक अर्जदारांना अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे फॉर्म सादर करण्याची खात्री करण्याचा सल्ला देते.

  • 01 Dec 2025 04:55 PM (IST)

    01 Dec 2025 04:55 PM (IST)

    राज्यातील १८ हजार शाळांवर संकट कायम, शिक्षकांचे 25 हजार पदे अतिरिक्त

    राज्यातील शाळांच्या संच मान्यतेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातून राज्यातील बहुसंख्य अनुदानित आणि सरकारी शाळा संकटात सापडल्या आहेत. त्यात ५ डिसेंबरपर्यंत होणाऱ्या संच मान्यतेनंतर शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरून राज्यातील कमी पटसंख्येच्या सुमारे १८ हजारांहून अधिक शाळा बंद पडतील. त्यामुळे राज्यातील सरकारी अनुदानित शिक्षण व्यवस्थाच धोक्यात येईल, अशी शिक्षक संघटनांनी भीती व्यक्त केली. सरकारच्या या धोरणाविरोधात राज्यातील तब्बल १२हून अधिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबरला राज्यातील शाळशा बंद ठेवण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी राज्यातील शाळा, शिक्षण संस्थाचालक आदींना पत्र लिहून 5 डिसेंबरला सरकारच्या धोरणाविरोधात सर्व शाळांनी बंद करून सरकारपर्यंत आपला निषेध पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.

  • 01 Dec 2025 04:50 PM (IST)

    01 Dec 2025 04:50 PM (IST)

    PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प

    आरबीआयकडून आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत, आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवणे आणि एसबीआय एमकॅश सेवा बंद करणे समाविष्ट करण्यासारखे निर्णय घेतले आहे. आरबीआय व्याजदर ०.२५% ने कमी करून ५.२५% पर्यंत कमी करू शकते. आयकर विभागाने तुमचा पॅन आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित केली आहे. हा नियम १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार नोंदणी आयडीसह पॅन जारी केलेल्यांना लागू होतो.

  • 01 Dec 2025 04:45 PM (IST)

    01 Dec 2025 04:45 PM (IST)

    राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी

    आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आमदार रोहित पवार यांनी यामधून राणे कुटुंबावर सल्ला देताना टीकास्त्र डागलं. तसेच हा भावकीतील वाद जवळून पाहिला असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळं राणे कुटुंबात सुरु असलेला वाद योग्य वाटत नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

  • 01 Dec 2025 04:40 PM (IST)

    01 Dec 2025 04:40 PM (IST)

    खापोली नगरपरिषदेच्या रणधुमाळीत हाय होल्टेज ड्रामा

    खोपोली नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी प्रणित परिवर्तन विकास आघाडीची सभा झाली व शिवसेना भाजप आरपीआय महायुतीची सभा झाली या दोन्ही सांभामध्ये रंगले हे डि एन ए वॉर.आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंचा डि एन ए कोणता असा सवाल केला होता त्याला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवेना डि एन ए चा लॉंग फॉर्म विचारला आणि त्याला उत्तर देताना महेंद्र थोरवे यांनी भर सभेत डि एन ए चा फुलफॉर्म सांगून ताटाकरेंचा राजकीय डि एन ए खराब असल्याची टीका केली.

  • 01 Dec 2025 04:35 PM (IST)

    01 Dec 2025 04:35 PM (IST)

    मीरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

    आज सकाळी साडेसहा वाजता स्कूल प्रशासनाला धमकीचा मेल प्राप्त झाला असून, त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.काशिमिरा पोलिस व बॉम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण स्कूल खाली करून मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू आहे.

  • 01 Dec 2025 04:30 PM (IST)

    01 Dec 2025 04:30 PM (IST)

    शिवाजी स्टेडीयम मधील गाळ्यांना ‘शॉर्टसर्किट’मुळे आग

    रत्नागिरी शहरात सलग तिसऱ्या दिवशीही आगीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी ११वा.च्या सुमारास मारुती मंदिर शिवाजी स्टेडियमला लागून असलेल्या गाळ्यांना आणि गाळ्याच्या छतांवर शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, ही आग प्रथम दुकानाच्या गाळ्यांच्या छतावर लागली. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.काही वेळातच परिसरातील जागरूक रहिवाशांनी कोणतीही वेळ न घालवता आग विझवण्याचे काम सुरू केले.

  • 01 Dec 2025 04:25 PM (IST)

    01 Dec 2025 04:25 PM (IST)

    अलिबाग पोलिस ठाण्यात विषारी नागाचे पिल्लू; सतर्क पोलिसांनी वाचवला जीव

    अलिबाग पोलिस ठाणे आवारात सोमवारी सकाळी अचानक एक विषारी नाग जातीच्या सर्पाचे पिल्लू आढळून आले. रोजच्या प्रमाणे पोलिस कर्मचारी आपापल्या कामात मग्न असताना ठाण्याच्या एका कोपऱ्यात लहानसा सर्प वळवळत असल्याचे पोलिस शिपाई संकेत पाटील यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला हे पिल्लू पाहून काही क्षण परिसरात खळबळ उडाली; मात्र कोणताही अपघात घडू नये याची काळजी घेत पोलिसांनी प्रसंगावधान दाखवले.

  • 01 Dec 2025 04:21 PM (IST)

    01 Dec 2025 04:21 PM (IST)

    माथेरान मतदान साहित्यासाठी इ रिक्षा आणि रुग्णवाहिका

    कर्जत तालुक्यातील माथेरान गिरीस्थान नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून सर्व दहा मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहचले आहे.दरम्यान,माथेरान मध्ये पर्यावरण पुरक इ रिक्षा आणि रुग्णवाहिका यांचा वापर मतदान साहित्य आणि मतदान केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांना पाठवण्यासाठी करण्यात आला.

  • 01 Dec 2025 03:43 PM (IST)

    01 Dec 2025 03:43 PM (IST)

    नात्यांची गोड- कडू बाजू दाखवणारं, ‘एकदा पाहावं करून’ नाटक रंगभूमीवर!

    प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारं ‘एकदा पाहावं करून’ नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 01 Dec 2025 03:32 PM (IST)

    01 Dec 2025 03:32 PM (IST)

    Elon Muskला उफाळून आले भारत प्रेम; H-1B विषयी केली खास विनंती

    अमेरिकेतील (America) विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून हे कामगार आणि तंत्रज्ञ अमेरिकेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. काही कंपन्यांनी एच-1B (H-1B) व्हिसा धोरणाचा गैरवापर केला असला तरी, संपूर्ण व्हिसा प्रोग्राम बंद करणे हे अमेरिकेसाठी धोकादायक ठरेल असे मत एरोस्पेस व टेक्नॉलॉजी क्षेत्रातील उद्योजक आणि सीईओ एलोन मस्क यांनी व्यक्त केले आहे.

  • 01 Dec 2025 03:17 PM (IST)

    01 Dec 2025 03:17 PM (IST)

    ‘व्ही. शांताराम’ यांचा बायोपिक, ‘हा’ बॉलीवूड अभिनेता साकारणार भूमिका

    भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे.

  • 01 Dec 2025 02:51 PM (IST)

    01 Dec 2025 02:51 PM (IST)

    देवमाणूस- मधला अध्यायमध्ये नवा ट्विस्ट, साकेतचा खून, शामल साक्षीदार

    ‘देवमाणूस- मधला अध्याय’ मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली. आर्या हा संपूर्ण प्रसंग अजीतला सांगते, आणि अजीत तिला बँकेतून पैसे काढण्यास प्रवृत्त करतो. मात्र, त्या व्यवहारासाठी साकेतची सही आवश्यक असल्याने तो नकार देतो. त्यामुळे त्यांच्यात तीव्र वाद निर्माण होतो. वाद वाढत असतानाच आर्या भावनिकदृष्ट्या अजीतच्या अधिक जवळ येऊ लागलेय. हे पाहून लालीच्या मनात मत्सर निर्माण होतो.

  • 01 Dec 2025 02:45 PM (IST)

    01 Dec 2025 02:45 PM (IST)

    भारतीय चित्रपटांचा गेमचेंजर; ‘व्ही. शांताराम’ यांचा बायोपिक, 'हा' बॉलीवूड अभिनेता साकारणार भूमिका

    भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.

  • 01 Dec 2025 02:40 PM (IST)

    01 Dec 2025 02:40 PM (IST)

    निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का?

    राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • 01 Dec 2025 02:35 PM (IST)

    01 Dec 2025 02:35 PM (IST)

    बांगलादेश न्यायालयाने ब्रिटिश खासदाराला सुनावली 2 वर्षांची शिक्षा

    बांगलादेशमधील ( Bangladesh) न्यू टाउन भूखंड खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांगीण वादाचे रूप धारण केले आहे. एका न्यायालयीन निकालानुसार, ब्रिटिश खासदार Tulip Siddiq यांना कमकुवत किंवा फायद्याच्या दरात भूखंड खरेदी केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे ते बऱ्याच राजकीय चर्चांचा विषय बनले आहेत, कारण त्यांचा कुटुंबीय संबंध माजी पंतप्रधान Sheikh Hasina यांच्याशी असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.

  • 01 Dec 2025 02:27 PM (IST)

    01 Dec 2025 02:27 PM (IST)

    कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला

    जिल्ह्यात 4 दिवसांपासून कमी झालेली थंडी रविवारी पुन्हा जोरदार परतली. दिवसभर बदलत्या हवामानानंतर रात्री व पहाटे थंडीची स्पष्ट जाणीव होत असून, तापमानातील घट शहरासह ग्रामीण भागात जाणवण्याइतकी ठळक दिसत आहे. रविवारी किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. आर्द्रतेचे प्रवाह कमकुवत झाल्याने हवेत गारवा वाढला असून वातावरणात थंड हवा वाढल्याचं दिसून येत आहे. थंडीच्या तडाख्याने कोल्हापुरकरांना चांगलीच हुडहुडी भरलेली दिसतंय.

  • 01 Dec 2025 02:16 PM (IST)

    01 Dec 2025 02:16 PM (IST)

    अखेर सामंथाने नव्याने थाटला संसार! दिग्दर्शक राज निदिमोरूशी केले लग्न

    नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी, समांथा रूथ प्रभूने एक नवीन जीवन सुरू केले आहे. अभिनेत्रीने आज सोमवार, १ डिसेंबर रोजी राज निदिमोरूशी लग्न केले. समांथाने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे, ज्यामध्ये ती एका चमकदार लाल साडीत वधूच्या सजलेल्या अवतारात दिसत आहे.

  • 01 Dec 2025 02:02 PM (IST)

    01 Dec 2025 02:02 PM (IST)

    स्मृती मानधनासोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाला पलाश

    क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न होणार होते. लग्नापूर्वीचे उत्सव सुरू झाले होते. त्यांच्या हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभांचे व्हिडिओ व्हायरल झाले. पण अचानक त्यांच्या लग्नाला स्थगिती मिळाल्याची बातमी समोर आली. या नंतर दोघेही खूप चर्चेत आले.

  • 01 Dec 2025 01:55 PM (IST)

    01 Dec 2025 01:55 PM (IST)

    काहीतरी मोठं घडणार? NIAची कश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणांवर छापेमारी

    दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) काश्मीर खोऱ्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात आरोपींच्या कश्मीरमधील घरांवर एनआयए च्या पथकाने लक्ष्य केलं आहे. अलिकडेच एका आंतरराज्यीय “व्हाईट कॉलर” दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या मॉड्यूलशी संबंधित व्यक्तींकडून, प्रामुख्याने हरियाणातील फरीदाबाद येथून, अमोनियम नायट्रेटसह सुमारे 3,000 किलोग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

  • 01 Dec 2025 01:50 PM (IST)

    01 Dec 2025 01:50 PM (IST)

    ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप

    मागील काळात धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, त्यांचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टचार केला आहे. नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले आहेत. एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या दोनशे प्रकरणांत तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे.

  • 01 Dec 2025 01:45 PM (IST)

    01 Dec 2025 01:45 PM (IST)

    ‘पाकिस्तान भ्याड शत्रू, पण आम्ही हिशेब चुकता करू…’; ‘या’ देशाने Pakistanला दिली प्रत्युत्तर दाखल धमकी

    पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे ढग गडद होत आहेत. तालिबानचे उपपंतप्रधान तसेच संघटनेचे सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी पाकिस्तानवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला असून इस्लामाबादला “भित्रा शत्रू” ठरवत अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेत हस्तक्षेप करू नये, अशा शब्दांत थेट इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून अफगाण भूमीवर टीटीपी अर्थात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप तालिबानने केला आहे.

  • 01 Dec 2025 01:38 PM (IST)

    01 Dec 2025 01:38 PM (IST)

    “मॅजिक” एक दरवळणारं मायाजाल; एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार जितेंद्र जोशी !

    आजवर अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात ‘मॅजिक’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार असून, १ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 01 Dec 2025 01:30 PM (IST)

    01 Dec 2025 01:30 PM (IST)

    मीशो IPO डिसेंबर 3 पासून सुरू..; रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान ‘इतक्या’ रुपये गुंतवणूक आवश्यक

    ई-कॉमर्स कंपनी असलेल्या मीशोचा आयपीओ ३ डिसेंबरला उघडणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदार या इश्यूमध्ये गुंतवणूक करू शकतील. ई-कॉमर्स क्षेत्रातील मीशो ही वेगाने उदयास येणारी कंपनी असून अल्पावधीतच बाजारात स्वतःचे स्थान निर्माण केले. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या दिग्गजांशी स्पर्धा करत स्वता:चे स्थान निर्माण केले. अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मीशो आयपीओ ५,४२१.२० कोटी रुपयांनी व्यवहार करत आहेत. अंदाजे ३८% प्रीमियमवर व्यवहार सुरू असून ब्रोकरेज देखील सकारात्मक आहेत.

  • 01 Dec 2025 01:20 PM (IST)

    01 Dec 2025 01:20 PM (IST)

    पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचा पगार थकला; दैनंदिन उदरनिर्वाह करणे कठीण

     पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी शिक्षकांचा मागील तीन, काही शिक्षकांचा दोन तर काहींचा एक महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नसल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महागड्या शहरात राहून दैनंदिन उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, अनेक शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहरातील घरभाडे, वीज-पाणी बिले, प्रवास खर्च, मुलांचे शिक्षण, घरखर्च अशा मूलभूत गरजा पूर्ण करताना शिक्षक हैराण झाले आहेत. वेळेवर वेतन न मिळाल्याने कुटुंबाचा खर्च भागवणे अशक्य होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

  • 01 Dec 2025 01:10 PM (IST)

    01 Dec 2025 01:10 PM (IST)

    नागरिकांनो सावध व्हा, तो पुन्हा येतोय…! पुढील 48 तास धोक्याचे

    नागरिकांनो वेळीच सावध व्हा, आता स्वेटर नाही तर, पुन्हा छत्री आणि रेनकोट बाहेर काढण्याची वेळ आली आहे. ऐन थंडीच्या काळात हवामान विभागाकडून पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागराच गोंधळ सुरु असून आधी सेनयार चक्रीवादळ आणि आता डिटवाह चक्रीवादळ महाराष्ट्रावर घोंगावतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत आलेल्या धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • 01 Dec 2025 01:07 PM (IST)

    01 Dec 2025 01:07 PM (IST)

    ‘निवडणुका रद्द करणे पूर्णपणे चुकीचे! कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावले

    राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली.निवडणुका रद्द करण्याच्या चर्चेवर बोलताना फडणवीस यांनी तीव्र विरोध दर्शवला.

  • 01 Dec 2025 01:05 PM (IST)

    01 Dec 2025 01:05 PM (IST)

    उपनिरीक्षक भरती, 15 डिसेंबरपासून करा अर्ज, 1.13 लाखपर्यंत पगार

    जर तुम्हाला पोलिस खात्यात सब-इन्स्पेक्टर म्हणून सरकारी नोकरी हवी असेल, तर एक नवीन भरतीची संधी उपलब्ध आहे. जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळाने (JKSSB) गृह विभागासाठी यूटी कॅडर सब-इन्स्पेक्टर (दूरसंचार) पदासाठी अर्ज मागवले आहेत. भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बोर्ड १५ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट jkssb.nic.in वर अर्ज प्रक्रिया सुरू करेल. करिअरची ही एक उत्तम संधी आहे, विशेषतः पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी. अर्ज करण्याची विंडो १३ जानेवारी २०२६ पर्यंत खुली राहील.

  • 01 Dec 2025 12:23 PM (IST)

    01 Dec 2025 12:23 PM (IST)

    ChatGPT युजर्ससाठी धक्का! अ‍ॅपमध्ये लवकरच दिसणार जाहिराती

    लोकप्रिय AI प्लॅटफॉर्म ChatGPT च्या करोडो यूजर्सना आता मोठा धक्का बसणार आहे. कारण आता OpenAI ने त्यांच्या AI चॅटबोटमध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. असं सांगितलं जात आहे की, आता OpenAI च्या AI चॅटबोट ChatGPT मध्ये जाहिराती दिसणार आहेत. याबाबत अनेक अपडेट्स देखील समोर येत आहेत.

  • 01 Dec 2025 12:14 PM (IST)

    01 Dec 2025 12:14 PM (IST)

    Jio चा एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा

    असे अनेक यूजर्स असतात ज्यांना इंटरनेट डेटाची जास्त गरज नसते, असे यूजर्स 1GB डेली डेटावाला प्लॅन शोधत असतात. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो यूजर्सना 1GB डेली डेटा ऑफर करतो. हा कंपनीचा असा एकमेव प्लॅन आहे, ज्यामध्ये यूजर्सना 1GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन केवळ MyJio अ‍ॅपवर उपलब्ध आहे, म्हणजेच Jio.com वर हा प्लॅन लिस्टेड नाही. यूजर्सना हा प्लॅन व्हॅल्यू प्लॅन्स कॅटेगरीअंतर्गत अफोर्डेबल पॅक्स विभागात मिळू शकते.

  • 01 Dec 2025 12:00 PM (IST)

    01 Dec 2025 12:00 PM (IST)

    हिवाळी अधिवेशनापूर्वी संसद भवनामध्ये विरोधकांची बैठक

    हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली असून यापूर्वी संसद भवनामध्ये विरोधकांची बैठक पार पडली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वांना संबोधित केले. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात इंडिया अलायन्सच्या फ्लोर लीडर्सची बैठक झाली.

  • 01 Dec 2025 11:55 AM (IST)

    01 Dec 2025 11:55 AM (IST)

    तामिळनाडूतील बस अपघाताबद्दल pm मोदींनी व्यक्त केले दुःख

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "तामिळनाडूतील शिवगंगा येथील अपघातात झालेले जीवित आणि वित्तहानी अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना ₹२ लाखांची मदत दिली जाईल. जखमींना ₹५०,००० मदत दिली जाईल." असे दुःख पंतप्रधानांनी व्यक्त केले.

  • 01 Dec 2025 11:45 AM (IST)

    01 Dec 2025 11:45 AM (IST)

    दिल्लीतील झंडेवालन मंदिराजवळील अतिक्रमणे अधिकाऱ्यांनी पाडली

    दिल्ली महानगरपालिकेने ऐतिहासिक नाथपंथी मंदिराभोवती अनधिकृत विस्तार आणि दुकाने हटवण्यासाठी अवजड यंत्रसामग्री आणि पोलिस तैनात केले, तर मुख्य मंदिर अबाधित ठेवले. निदर्शकांनी दावा केला की ही कारवाई जवळच्या आरएसएस मुख्यालय, केशव कुंज येथे पार्किंगच्या गरजांना अनुकूल होती आणि १९४८ आणि १९७७ मध्ये नूतनीकरण केलेल्या रामकथा पठणाच्या स्थळाला लक्ष्य करत होती. भाजपच्या नेतृत्वाखालील नागरी संस्थेकडून पक्षपाताच्या आरोपांदरम्यान, अधिकाऱ्यांनी सार्वजनिक जागा परत मिळवण्याचा हा एक नियमित प्रयत्न असल्याचे वर्णन केले.

  • 01 Dec 2025 11:35 AM (IST)

    01 Dec 2025 11:35 AM (IST)

    “अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा"; भाजप आमदाराच्या वक्तव्याने रोहित पवार आक्रमक

    आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भाजप आमदाराचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी भाजपच्या नेत्याच्या वक्तव्यावर खरपूस टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, “अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा", हे शब्द आहेत भाजपा आमदारांचे..! हा आहे भाजपचा खरा चेहरा आणि वोटचोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला.. निवडणूक आयोगाला हे दिसणार नाही, कारण निवडणूक आयोग कुंभकर्णाप्रमाणे झोपला आहे… १००० रुपयाचं बक्षीस घोषित करणारे बावनकुळे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काही बोलणार का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.

    “अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा", हे शब्द आहेत भाजपा आमदारांचे..! हा आहे भाजपचा खरा चेहरा आणि वोटचोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला..

    निवडणूक आयोगाला हे दिसणार नाही, कारण निवडणूक आयोग कुंभकर्णाप्रमाणे झोपला आहे…

    १००० रुपयाचं बक्षीस घोषित करणारे बावनकुळे साहेब आणि… pic.twitter.com/SKIHesM9V8

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 1, 2025

  • 01 Dec 2025 11:25 AM (IST)

    01 Dec 2025 11:25 AM (IST)

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनात PM मोदी सहभागी

    संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणानंतर होणाऱ्या या अधिवेशनामध्ये संरक्षण आणि सुरक्षेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आजपासून सुरु झालेल्या या अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी झाले आहेत. उपस्थितांना संबोधित करत त्यांनी हिवाळी अधिवेशनाची सुरुवात केली.

    Speaking at the start of the Winter Session of Parliament. May the session witness productive discussions. https://t.co/7e6UuclIoz

    — Narendra Modi (@narendramodi) December 1, 2025

  • 01 Dec 2025 11:25 AM (IST)

    01 Dec 2025 11:25 AM (IST)

    वडोदरा येथे जेपी नड्डा यांच्या भाषणादरम्यान सुरक्षा रक्षक कोसळला

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे भाषण संपत असताना शनिवारी गुजरातमधील वडोदरा येथे ही घटना घडली. उच्चस्तरीय झेड-प्लस संरक्षण प्रदान करणारा गार्ड उन्हात तासन्तास उभे राहिल्याने कोसळला असावा. त्याला जवळच त्वरित वैद्यकीय सेवा मिळाली आणि आता त्याची प्रकृती स्थिर आहे. व्हिडिओंमध्ये नड्डा आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू थांबल्याशिवाय स्टेजवरच असल्याचे दिसून आले, ज्यामुळे गार्डच्या समर्पित सेवेदरम्यान नेत्यांच्या प्रतिसादावर टीका होत आहे.

    BJP अध्यक्ष जेपी नड्डा गुजरात में एक कार्यक्रम में भाषण दे रहे थे, तभी एक सुरक्षा कर्मी बेहोश होकर गिर पड़ा।

    लेकिन न तो जेपी नड्डा ने भाषण रोका, न ही मंच पर बैठे BJP के नेता मदद को आगे आए।

    ये बताता है कि BJP के नेताओं में संवेदना का जरा भी भाव नहीं है।

    यही वजह है कि जनता चाहे… pic.twitter.com/aUUXagfNCq

    — Congress (@INCIndia) November 30, 2025

  • 01 Dec 2025 11:15 AM (IST)

    01 Dec 2025 11:15 AM (IST)

    BSF स्थापना दिनानिमित्त अमित शाह यांच्या खास शुभेच्छा

    बीएसएफ स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी लिहिले आहे की, "बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. देशभक्तीचे प्रतीक असलेले हे बलBSF ने नेहमीच राष्ट्राचा सन्मान राखला आहे आणि हिमालयीन दृढनिश्चय आणि पोलादी शौर्याने नागरिकांच्या कल्याणाचे रक्षण केले आहे. सर्वोच्च बलिदानाने त्यांनी प्रज्वलित केलेली देशभक्तीची अखंड ज्योत भारतीयांच्या पिढ्यांना मार्ग दाखवत राहील. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना सलाम," अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.

    Warm greetings to BSF personnel and their families on their Raising Day.

    A force synonymous with fiery patriotism, the @BSF_India has always upheld the honor of the nation and shielded the well-being of the citizens with Himalayan resolve and steely valor. The undying flame of… pic.twitter.com/fVKJGkYxUi

    — Amit Shah (@AmitShah) December 1, 2025

  • 01 Dec 2025 11:02 AM (IST)

    01 Dec 2025 11:02 AM (IST)

    भारतीय सुरक्षा दल अर्थात BSF ची झाली स्थापना

    संपूर्ण देशाचे रक्षण करणाऱ्या बीएसएफची आजची दिवशी 1965 साली स्थापना झाली. बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल. हे भारतातील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आहे . पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी बीएसएफ जवान दिवत्ररात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमांची सुरक्षा आणि संबंधित बाबींसाठी त्याची स्थापना करण्यात आली. १९६५ मध्ये बीएसएफच्या २५ बटालियन होत्या, आता त्यांची संख्या १९३ बटालियन झाली आहे. या बटालियनमध्ये २,७०,००० कर्मचाऱ्यांची संख्या आहे ज्यात विस्तारित हवाई शाखा, जल शाखा , तोफखाना रेजिमेंट आणि विशेष युनिट्सचा समावेश आहे.

  • 01 Dec 2025 11:00 AM (IST)

    01 Dec 2025 11:00 AM (IST)

    Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले

    मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महिलेला मिटींगच्या बहाण्याने कंपनीच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर तिला बंदुकीचा धाक दाखवत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यांनतर आरोपीने महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली. एवढेच नाहीतर तिला नग्न अवस्थेतील फोटो व्हिडिओ देखील काढले. तिला या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी Franco India Pharmaceutical कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह पाच जणांविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

  • 01 Dec 2025 10:50 AM (IST)

    01 Dec 2025 10:50 AM (IST)

    ‘Tere Ishk Mein’ चित्रपटाचा पहिल्या आठवड्यात धुमाकूळ, मोडले २९ चित्रपटांचे रेकॉर्ड

    धनुष आणि कृती सॅनन यांचा रोमँटिक चित्रपट “तेरे इश्क में” ला प्रेक्षकांचा चांगला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या तीव्र रोमँटिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली. आठवड्याच्या शेवटी, बॉक्स ऑफिसवर धमाका झाला. शनिवारी त्याच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली असली तरी, रविवारीही त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. “तेरे इश्क में” ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

  • 01 Dec 2025 10:40 AM (IST)

    01 Dec 2025 10:40 AM (IST)

    Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल

    फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये वेगवेगळे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. काही रिवॉर्ड्स फाइटिंगसाठी असतात तर काही रिवॉर्ड्स कॉस्मेटिकसाठी असतात. याचा वापर शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय या रिवॉर्डसच्या मदतीने प्लेअर्स त्यांच्या कॅरेक्टरला वेगळा लूक देऊ शकतात.

  • 01 Dec 2025 10:39 AM (IST)

    01 Dec 2025 10:39 AM (IST)

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

    संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरू होत असून १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सरकारकडून अनेक महत्त्वाची विधेयके सादर करण्याची तयारी आहे, तर विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी सज्ज आहे.

    या अधिवेशनात सरकार अणुऊर्जा, उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, तसेच कॉर्पोरेट व शेअर बाजार नियमांशी संबंधित अशा एकूण १० महत्त्वाच्या विधेयकांची मांडणी करणार आहे. दुसरीकडे, विरोधी पक्ष एसआयआर (विशेष तपास अहवाल), वायू प्रदूषण आणि इतर सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याची योजना आखत आहे.

  • 01 Dec 2025 10:30 AM (IST)

    01 Dec 2025 10:30 AM (IST)

    Elon Muskलाही भारतीय वंशाचा सार्थ अभिमान; जाणून घ्या का मुलाचे नाव ठेवले शेखर

    टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे सीईओ तसेच जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले एलोन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी कारण केवळ त्यांचा एखादा तंत्रज्ञान प्रकल्प नाही, तर भारताशी जोडलेला एक भावनिक आणि सन्मानाचा निर्णय आहे. मस्क यांनी अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान खुलासा केला की, त्यांच्या एका मुलाचे मधले नाव ‘शेखर’ असे आहे आणि हे नाव त्यांनी महान भारतीय-अमेरिकन खगोलभौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे. हा खुलासा समोर आल्यानंतर जगभरात, विशेषतः भारतात, मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

  • 01 Dec 2025 10:20 AM (IST)

    01 Dec 2025 10:20 AM (IST)

    श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु

    श्रीलंकेत (Sri Lanka) चक्रीवादळ दित्वाहने प्रचंड विध्वंस घडवला आहे. या चक्रीवादळामुळे (Cyclone) आतापर्यंत ३३० लोकांचा मृ्त्यूची माहिती समोर आली आहे. तसेच ३७० लोक अद्यापही बेपत्ता आहेत. सध्या भारताच्या मदतीने या लोकांच्या शोधाचे आणि पूरात अडकलेल्यांच्या बचावा कार्य सुरु आहे. भारताच्या हवाई दलाने आणि NDRF चे कर्मचाऱ्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले आहे.

  • 01 Dec 2025 10:10 AM (IST)

    01 Dec 2025 10:10 AM (IST)

    Kolhapur News: शक्तीपीठ महामार्ग झाल्यास चंदगडला पर्यटनाचा दर्जा देणार

    ९० हजार कोटीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग चंदगड मध्ये आल्यास या तालुक्यास पर्यटनाचा दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केली. त्याचबरोबर भाजप सरकारने या तालुक्यासाठी आत्तापर्यंत कोट्यावधीचा निधी दिला असल्याने नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुती निवडून आणा असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

  • 01 Dec 2025 09:59 AM (IST)

    01 Dec 2025 09:59 AM (IST)

    सोन्या – चांदीच्या दरात किंचीत घसरण!

    Gold Rate Today: भारतात 1 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,981 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,899 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,736 रुपये आहे. भारतात 1 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,810 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,360 रुपये आहे. भारतात 1 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 184.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,84,900 रुपये आहे.

  • 01 Dec 2025 09:55 AM (IST)

    01 Dec 2025 09:55 AM (IST)

    ’Ai can’t replace मराठी नाटक’- मांजरेकर

    मराठी नाटकांच्या थिएटरमध्ये नुकतेच वर वरचे वधू वर, देवभावळी आणि यांसारखे अनेक नाटकं गाजत असताना. आता आणखी एक नाटक रंगभूमीवर येऊन धडकणार आहे. या नाटकात पहिल्याच आपल्याला महेश मांजरेकर आणि भरत जाधव ही जोडी रंगभूमीवर एकत्र दिसणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट केल्यानंतर महेश मांजरेकर ही तब्बल २९ वर्षांनी पुन्हा नाटकाकडे वळले आहेत. ज्या नाटकाचं नाव ’शंकर जयकिशन’ आहे.

  • 01 Dec 2025 09:50 AM (IST)

    01 Dec 2025 09:50 AM (IST)

    भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला नेपाळ

    Nepal Earthquake News in Marathi : काठमांडू : भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. रविवारी (30 नोव्हेंबर) नेपाळच्या सुदूर पश्चिम प्रांत बझांगमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे लोक भीतीने घराबाहेर पडले होते. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेली नाही.

  • 01 Dec 2025 09:45 AM (IST)

    01 Dec 2025 09:45 AM (IST)

    भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र वातावरण

    India Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १ डिसेंबर रोजी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे, कारण भारताच्या दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सुरुवातीपासूनच गॅप-अप दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,५३० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १४३ अंकांचा प्रीमियम होता.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports weather business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Breaking News Updates Today: परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारची तयारी सुरु, असा आहे प्लॅन…
1

Breaking News Updates Today: परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारची तयारी सुरु, असा आहे प्लॅन…

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
2

Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा
3

Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा

Breaking News Updates Today: अमेरिका-इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला, भारतीय विद्यार्थ्यांची सरकारकडे मदतीची मागणी
4

Breaking News Updates Today: अमेरिका-इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला, भारतीय विद्यार्थ्यांची सरकारकडे मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.