
Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
Maharashtra to World Breaking News: रियाध/तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील परिस्थिती पूर्णत: नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिका(America)-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. हे इराणचे सर्वात मोठे नुकसान मानले जात आहे. यामुळे इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत विनाशाकारी सूड उगवण्यास सुरुवात केली आहे.
03 Mar 2026 06:49 PM (IST)
मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेक महाराष्ट्राचे नागरिक दुबई आणि युएईमध्ये अडकले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. या प्रयत्नांमुळे, आज दुपारी (मंगळवार, ३ मार्च) स्टार एअरच्या दोन विशेष विमाने फुजैराह विमानतळावरून रवाना होतील.
03 Mar 2026 06:40 PM (IST)
हिंदू धर्मात जसं ज्योतिषशास्त्राला महत्व आहे तसंच अंकशास्त्रदेखील महत्वाचं मानलं जातं. अंकशास्त्रानुसार प्रत्येक मुलांक व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रभाव टाकतो. त्या त्या ठराविक मुलांकाचा स्वामी आणि त्याचा प्रभाव हा आपल्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो. असेच काही मुलांक आहेत ज्यामुळे या मुलांकाच्या मुली समाजात उठून दिसतात. कोणते आहेत ते मुलांक जाणून घेऊयात.
03 Mar 2026 06:35 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
03 Mar 2026 06:30 PM (IST)
JEE Main 2026 News in Marathi: जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईई) मेन २०२६ सत्र १ चे निकाल जाहीर झाले आहेत. जेईई मेन सत्र २ साठी अर्ज प्रक्रिया संपली आहे. दरम्यान, आयआयटी रुरकीने जेईई अॅडव्हान्स्डसाठीही तयारी पूर्ण केली आहे. मोठ्या संख्येने उमेदवार चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. तथापि, तज्ञांचा असा विश्वास आहे की ज्याप्रमाणे उमेदवार अभियांत्रिकी महाविद्यालय निवडण्यास प्राधान्य देतात, त्याचप्रमाणे त्यांनी बीटेक शाखा निवडण्यास देखील प्राधान्य दिले पाहिजे. या मालिकेत बीटेक इन इंजिनिअरिंग फिजिक्स आणि अभियांत्रिकी विज्ञान शाखांबद्दल चर्चा करूया. दोन्ही अभियांत्रिकी शाखांमध्ये काय विशेष आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
03 Mar 2026 06:25 PM (IST)
India Air Defence Upgrade : नवी दिल्ली : मध्यपूर्वेत इराण (Iran) विरुद्ध अमेरिका(America)-इस्रायल (Israel) तणाव प्रचंड वाढला आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने मोठे निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेत वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी रशिया, फ्रान्स आणि इस्रायलसोबत मोठा संरक्षण करारावर चर्चा सुरु आहे. मात्र यामुळे चीन आणि पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली आहे.
03 Mar 2026 06:21 PM (IST)
पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर काही दिवस आधी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 32 तासांपेक्षा जास्त कालावधी वाहतूक कोंडी झालेली. गॅस टॅंकर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यानंतर सरकारवर, तेथील प्रशासनावर देखील टीका झाली. यानंतर आता नवीन मार्गाचा प्रस्ताव समोर येत आहे.
03 Mar 2026 06:14 PM (IST)
Iran Israel US War : महायुद्ध भडकल्यामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर Iranच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ‘होर्मुजची सामुद्रधुनी’जहाजांसाठी बंद केली आहे. त्यामुळ जागतिक तेल व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे. Iran,Israel आणि US यांच्यातील हा संघर्ष फक्त लष्करी कारवाईपुरता मर्यादित राहिलेला नाहीत. आता त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जेव्हा जगातील एखाद्या मोठ्या तेल उत्पादक क्षेत्रात युद्धाचे काळेघोर ढग दाटतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ तितक्याच देशांपुरता राहता नाही. तर जागतिक स्वरुपात दिसून येतो. Iranशी संबंधित या युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बिघडल्यास झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर गगनाला भिडतील, ज्याचा थेट आणि मोठा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसू शकतो.
03 Mar 2026 06:03 PM (IST)
Pakistan High Court Viral Video: पाकिस्तानमधील (Pakistan) न्यायव्यवस्थेची आणि कायद्याच्या सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या (Lahore High Court) आवारात वकिलांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, ज्या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते, तिथेच कायद्याचे रक्षक एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवताना दिसत आहेत.
03 Mar 2026 05:50 PM (IST)
अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं दुबईतील विमानांची उड्डाण बंद आहेत. परिणामी पुण्यातील आणखी चाळीस पर्यटक अडकून आहेत. दुबई प्रशासन सतर्क असून त्यांनी सर्वोतोपरी उपाययोजना राबवलेल्या आहेत. मात्र आता भारतात येण्याची ओढ लागल्याचं अन दिवसेंदिवस चिंता वाढत असल्याचं हे पर्यटक सांगतायेत. खरं तर आज हे सर्व पर्यटक भारतात परतणार होते, मात्र दुबईतील परिस्थिती पाहता आणखी किती दिवस ते अडकून राहतील. याचं उत्तर त्यांना मिळत नाहीये.....
03 Mar 2026 05:40 PM (IST)
रेल्वे ग्रुप डी पदांसाठी प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Railway Recruitment Board (RRB) ने 21,997 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2026 होती, ती आता 9 मार्च 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) करण्यात आली आहे. तसेच अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 मार्चवरून 11 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
03 Mar 2026 05:30 PM (IST)
आज देशभरात सगळीकडे होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात रंगाची उधळण होत आहे. त्यातच देशातील हवामानात बदल होताना दिसून येत आहे. मार्च महिन्यात देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. मध्य भारतात तापमानात वाढ झाली आहे. डोंगराळ भागात पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत तापमानात 3 ते 4 डिग्रीने वाढण्याचा अंदाज आहे. आयएमडीने अनेक राज्यांना इशारा दिला आहे.
03 Mar 2026 05:20 PM (IST)
अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय.कायम कर्मचाऱ्यांचा 2025 चा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही तो मिळावा, वेतनबदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, वेतनासोबत इ.पी.एफ., एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे. कपातींचे चेक देय वेतनासोबतच अदा करावेत,कर्मचाऱ्यांना मासिक वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय.जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
03 Mar 2026 05:10 PM (IST)
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या निर्मला जाधव या कलाकेंद्र चालवून आपल्या पोटाची गुजरात करतात. त्यांचं बार्शी रोड वरती एक स्वतःचे कला केंद्र आहे मात्र पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून घरातील जवळपास सहा लाख रुपयांचा सोन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताना आरोपींनी डोक्याला थेट पिस्तूल लावली आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याची धमकी दिली. पहाटेच्या सुमारास घरात येऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि निर्मला जाधव यांच्या घरातील एकूण मुद्देमाल जवळपास नऊ लाख 51 हजार रुपयांचा सोनंलंपास केलं. या प्रकरणात आता येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
03 Mar 2026 05:00 PM (IST)
भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेज-७ परिसरात सुरू होणाऱ्या कथित अवैध कॅफेविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी DCP यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
03 Mar 2026 04:50 PM (IST)
कोल्हापूरात आज होळी सणादिवशीचं निवडणूक भत्ता मिळावा यासाठी आशा सेविका रस्त्यावर उतरल्यातं. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होवून दीड महिना झालं तरीसुध्दा 275 आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने आशा सेविकांकडून महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आलीतं..यावेळी आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला..दरम्यान महापौर रुपाराणी निकम यांनी या आंदोलक महिलांची भेट घेत निवेदन स्विकारलं. शिवाय येत्या 12 दिवसात निवडणूक भत्ता देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय..तसचं महिलानारी आपल्या हक्कांसाठी लढत असल्याचं कौतुक केलंय.यावेळी आपण महापालिकेच्या कारभारावर कंटाळलो आहे.. त्यामुळे आता मी ॲक्शन मोडवर आल्याचं म्हणतं आपण ताराराणीच्या लेकी आहात.रस्त्यावर आंदोलन करायला लागतयं हा कमीपणा असल्याची खंत महापौरांनी बोलून दाखवली. महिलांनी रस्त्यावर बसलेलं मला आवडणार नाही.आपण काय भीक मागत नाही..त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रश्नांसाठी महापालिकेत आपल्याला भेटण्याचं महापौरांनी सांगितलं.
03 Mar 2026 04:40 PM (IST)
कोकणात पारंपरिक उत्साहात शिमगा साजरा होत आहे. आ. भास्कर जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावात उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत शिमगोत्सवात सहभाग घेतला. ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी शिमगोत्सव साजरा केला.
03 Mar 2026 04:35 PM (IST)
जालन्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी फुलांची उधळण करत आगळीवेगळी होळी साजरी केली. जालन्यात मागील अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि फुलांची उधळण तसेच गुलालाचा टीका लावून होळी साजरी करावी असा संदेश खोतकर यांनी दिला.
03 Mar 2026 04:30 PM (IST)
अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं दुबईतील विमानांची उड्डाण बंद आहेत. परिणामी पुण्यातील आणखी चाळीस पर्यटक अडकून आहेत. दुबई प्रशासन सतर्क असून त्यांनी सर्वोतोपरी उपाययोजना राबवलेल्या आहेत. मात्र आता भारतात येण्याची ओढ लागल्याचं अन दिवसेंदिवस चिंता वाढत असल्याचं हे पर्यटक सांगतायेत. खरं तर आज हे सर्व पर्यटक भारतात परतणार होते, मात्र दुबईतील परिस्थिती पाहता आणखी किती दिवस ते अडकून राहतील. याचं उत्तर त्यांना मिळत नाहीये.
03 Mar 2026 04:30 PM (IST)
टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विजेतेपदापासून अवघ्या दोन पाऊल दूर असलेल्या चार बलाढ्य संघांमधील रणसंग्रामापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी दोन्ही उपांत्य फेरीच्या (Semi-final) सामन्यांसाठी आयसीसीने अनुभवी अंपायर्स आणि मॅच रेफरींच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे.
03 Mar 2026 04:20 PM (IST)
इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील वाढलेल्या संघर्षाचा फटका परदेशात गेलेल्या भारतीयांना बसला आहे. दुबईतील विमान उड्डाणे स्थगित झाल्याने अहिल्यानगर शहरातील अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. सध्या हे सर्व पर्यटक सुखरूप असून दुबई सरकार त्यांची काळजी घेत आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तसा व्हिडिओ देखील व्यावसायिक धीरज नय्यर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी भारत सरकारकडे आपल्या स्वकीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे आवाहन केले आहे.
03 Mar 2026 04:20 PM (IST)
शहरालगत असलेल्या आदिला नदीला नाला समजून रेखांकन करा असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णया विरोधात पर्यावरण आणि निसर्गप्रेमी आता चांगले आक्रमक झाले आहेत. तसेच ऐतिहासिक नोंद असलेल्या आदिला नदीचा नाला कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
03 Mar 2026 04:15 PM (IST)
परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचे सर्वाधिक 24 जागा निवडून आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार आहे तर परभणी जिल्हा परिषदेमध्ये महायुती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे त्याबाबत चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांमध्ये हे स्पष्ट होणार आहे परभणी जिल्ह्यातील नऊ पैकी पाच पंचायत समितीवर भाजपाचा सभापती होईल तर परभणी पंचायत समितीमध्ये महायुती केली जाणार आहे भाजपला बाजूला ठेवून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यासाठी काही लोक हालचाली करत आहेत मात्र त्यांना दिवसा सपन पडत आहे काहीही झाले तरी भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिली आहे.
03 Mar 2026 04:10 PM (IST)
युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. मात्र या वाढलेल्या आकर्षक दरांकडे बघून गुंतवणूक करू नका. युद्ध संपल्यानंतर हे दर देखील कमी होतील. सोन्याकडे तात्पुरती गुंतवणूक म्हणून नव्हे तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनच बघा असे आवाहन जळगावचे सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी गुंतवणूकदारांना केले आहे.
03 Mar 2026 04:05 PM (IST)
माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या गिरीस्थान नगरपरिषद शिक्षण मंडळाची हुतात्मा वीर भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेने यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरावर भरारी मारली आहे.जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम आलेल्या माथेरान पालिका शाळेचे राज्यस्तरीय समितीने मूल्यांकन केले असून राज्य स्तरावर माथेरान पालिका नंबर पटकावेल असा आशावाद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना आहे.
03 Mar 2026 04:00 PM (IST)
रेल्वे ग्रुप डी पदांसाठी प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Railway Recruitment Board (RRB) ने 21,997 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2026 होती, ती आता 9 मार्च 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) करण्यात आली आहे. तसेच अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 मार्चवरून 11 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
03 Mar 2026 03:55 PM (IST)
इस्रायलचे पंतप्रधा बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनमधील भागाता ताबा मिळवण्यासाठी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहे. लेबनॉनमधील हिजुबल्लाह संघटनेचा खात्मा करण्यासाठी हल्ले सुरु करण्यात आले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्रायल इराणच्या सर्व प्रॉक्सी संघटनांना ठार करण्याच्या मोहिमेवर आहे.
03 Mar 2026 03:50 PM (IST)
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक सामूहिक हत्याकांडाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार सदस्यांची कुऱ्हाडीने वार करून निघून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेश येथील बराईच जिल्ह्यातील आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. आरोपीनेस रागाच्या भरात सर्व मर्यादा ओलांडून कुऱ्हाडीने सभासद वार करत आपल्याच कुटुंबातील क्षार सदस्यांची हत्या केली. मात्र त्यांनी हत्या का केली? जाणून घ्या.
03 Mar 2026 03:45 PM (IST)
इराण आणि ईस्रायलच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगभर उमटताना दिसत आहेत. मात्र अशातच काळजात धस्स करणारी बाातमी समोर आली आहे. ज्या अभिनेत्रीने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावलं ती लाफ्टर क्वीन आज लेकासाठी अहोरात्र रडत आहे. विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकल्याने गेले चार दिवस त्याला भारतात परत येण्यासाठी मार्ग मिळत नसल्याचं विशाखा सुभेदारने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. विशाखाने आपल्या मुलाला सोडवून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे विनंती केली आहे. वाचा सविस्तर
03 Mar 2026 03:40 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला असून याचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. यामुळे तेलाच्या रिफायनरीझवरही मोठा परिणाम झाला आहे. सौदी अरामकोच्या पाठिंब्यान चीनने एक रिफायनरी कंपनी झेजियांग पेट्रोकेमिकल कॉर्प सुरु केली होती. परंतु इस्रायल-इराण युद्धामुळे या कंपनीचे कामकाज बंद करण्यात आले आहे. या कंपनीच्या एकूण प्रक्रियेत २० टक्क्यांनी घटन होण्याची शक्यता आहे. मध्यूर्वेतील संघर्षामुळे तेलाचा साठा कमी पडत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार आहे. तसेच मध्यपूर्वेतून चीनला कच्च्या तेलाचा पुरवठ्याचा जवळपास अर्धा भाग मिळतो. मात्र युद्धामुळे पुरवठ्यात कमतरता झाली आहे.
03 Mar 2026 03:35 PM (IST)
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाज यांनी एक मोठा दावा केला आहे. अमेरिका-इस्रायलचे इराणविरोधी युद्ध पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे मावतेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे मुस्लिम देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांनी सांगितले की, पॅलेस्टिनी भूमीवर इस्रायलच्या स्थापनेपासूनच जगाला मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या झिओनिस्ट विचारसरणीमुळे मुस्लिम जग धोक्यात असले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, इराणविरुद्धचे हे युद्ध इस्रायली समुदायाच्या विचारसरणीचा प्रभाव वाढवणारे आहे.
03 Mar 2026 03:30 PM (IST)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इराण युद्धात दीर्घकाळ टीकणार नाही, त्याचा अंत जवळ आला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने जगभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी असेही म्हटले की, इराणचा अंत करुन मध्यपूर्वेत शांततेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
03 Mar 2026 03:25 PM (IST)
मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेत युद्ध भडकले आहे. या युद्धाने आखाती देशातील जवळपास सहा ते सात देश युद्धाच्या सावटाखाली आले आहेत. विमानसेवा रद्द करून विमानतळ बंद करण्यात आले आहेत. या युद्धामुळे आखाती देशात गेलेले भारतातील अनेक पर्यटक, प्रवासी अडकले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथील १० जणांसह मराठवाड्यातील एकूण १११ नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक सुखरूप आहेत. त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. वाचा सविस्तर
03 Mar 2026 03:20 PM (IST)
बिहार आणि देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी नवीन राजकीय खेळी केली आहे. नितीश कुमार यांनी त्यांच्या मुलाला देखील राजकारणामध्ये आणले आहे. त्यामुळे नितांश कुमार हे त्यांचे राजकीय वारसदार होणार का याची चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करू शकतात. त्यांच्या औपचारिक राजकीय प्रवेशाची घोषणा लवकरच होऊ शकते. (Political News) मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये, निशांत यांच्या पक्षात प्रवेशाची मागणी वाढत आहे. या बातमीमुळे जनता दल (युनायटेड) (जेडीयू) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर
03 Mar 2026 03:15 PM (IST)
टेक्नोने पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन CAMON 50 सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन CAMON 50 Ultra 5G या नावाने सादर केला आहे. हा फोन कोणताही मोठा ईव्हेंट आयोजित न करता लाँच करण्यात आला आहे. अधिक चांगली फोटोग्राफी आणि जबरदस्त ड्यूरेबिलिटीसाठी हे डिव्हाईस डिझाईन करण्यात आले आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये हाय-रेजोल्यूशन कॅमेरा सेंसर, एडवांस्ड AI फीचर्स आणि मिलिट्री-ग्रेड मजबूती दिली आहे.
03 Mar 2026 03:10 PM (IST)
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. टीम इंडियाचा उपांत्य सामना ५ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा माजी महान खेळाडू ग्लेन मॅकग्रा यांनी एक भाकित केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की भारत आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील. शिवाय, त्यांनी भारताला इशारा दिला आहे. वाचा सविस्तर
03 Mar 2026 03:05 PM (IST)
इराणवर येणारी संकटे थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीयेत. आधीच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर भीषण हल्ले करत असतानाच आता इराणवर नैसर्गिक संकट असल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. इराणच्या गेराश भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. हा भूकंप नैसर्गिक नसून त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर
03 Mar 2026 02:50 PM (IST)
वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिकेच्या इराणवरील संयुक्त कारवाईचे पडसाद जगभरात उमटू लागले आहे. नुकतेच अमेरिकेच्या टेक्सास राज्यात इराण समर्थिक रॅलीत गोळीबाराची घटना घडली आहे. ज्यामध्ये एका भारतीय विद्यार्थीनीसह चारजण ठार झाले आहेत. यामुळे संपूर्ण देशात आणि भारतात खळबळ उडाली आहे.
03 Mar 2026 02:40 PM (IST)
अमेरिका आणि इस्रायलने अखेर इराणवर हल्ला केला आणि त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण अरब जग आणि मध्य पूर्व युद्धाच्या ज्वाळांमध्ये बुडाले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानने प्रत्युत्तर दिले आहे. इराणने इस्रायली शहरांवर तसेच सौदी अरेबिया, ओमान, युएई आणि बहरीन सारख्या देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना विशेषतः लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणकडे हजारो ड्रोन आणि मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. यापैकी एक खोर्रमशहर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते चौथ्या पिढीचे क्षेपणास्त्र असल्याचे म्हटले जाते, ज्याला खैबर असेही म्हणतात. खोर्रमशहर-४ क्षेपणास्त्र अनेक प्रकारे ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक आहे.
03 Mar 2026 02:35 PM (IST)
विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या संगीत कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये झालेल्या त्यांच्या संगीत कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. लग्नाच्या फक्त दोन दिवस आधी आयोजित केलेला हा सोहळा इतका प्रेम, आनंद, हास्य आणि भावनिक क्षणांनी भरलेला होता की तो एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटला.
03 Mar 2026 02:27 PM (IST)
प्रशासनाची विकासकामं की अधोगतीची सुरुवात असा प्रश्न विचारण्याची वेळ कर्जतमधल्या शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग 76 या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.या रस्त्यावर साडे पाच मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता बनणार आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडे तोडली जाणार आहेत आणि या शक्यतेने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रस्त्याचे रुंदीकरण केले जात असताना रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारे जमीन अधिग्रहीत करण्यात आलेली नसताना शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता रस्त्यावरील कामे सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.दरम्यान,रस्त्यावर आपल्या मालकीच्या जागेत खोदकाम करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे,तर झाडे तोडण्यास विरोध करीत आहेत.
03 Mar 2026 02:15 PM (IST)
वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बारामती याचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात आले आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
03 Mar 2026 02:10 PM (IST)
सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान याचे शतक हे टी-२० विश्वचषक पाकिस्तानसाठी अविस्मरणीय होता. संपूर्ण स्पर्धेत संघाला फॉर्ममध्ये संघर्ष करावा लागला आणि सुपर ८ च्या पुढे जाण्यात अपयश आले. सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने संघातील इतर खेळाडूंपेक्षा विक्रमी कामगिरी केली. त्याने या हंगामात टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला, जो यापूर्वी विराट कोहलीने केला होता.
03 Mar 2026 02:05 PM (IST)
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील दुबईवर जोरदार हल्ला केला आहे. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्ध परिस्थितीमध्ये दुबईसह (Dubai News) आखाती राष्ट्रामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक नागरिक दुबई आणि इराण यासारख्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे हॉटेलमध्ये मुक्काम वाढवावा लागत असून, खर्च व इतर व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यासाठी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
03 Mar 2026 02:00 PM (IST)
सिद्धार्थ हा भांडुपच्या तुळशीत पाडा परिसरात राहत होता. 22 फेब्रुवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून तो घराबाहेर निघाला. मात्र रात्री उशीर झाला तरीही तो परतला नाही. त्याच्या पालकांनी त्याची शोधा शोध सुरू केली मात्र तो सापडला नाही. अखेर पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारीला मुलुंडच्या विहार तलावाजवळ सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला.
03 Mar 2026 01:50 PM (IST)
अजित पवार यांच्या अपघातीनिधनानंतर माजी मंत्री आणि बीडचे आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे हे सक्रीय राजकारणामध्ये आले असून यामुळे चर्चांना उधाण आले. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी गेल्या आठवड्यात जरांगे पाटील यांना धमकी दिली होती. आम्ही भाळी भंडारा लावल्याचे थेट इशारा त्यांनी दिला होता.यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
03 Mar 2026 01:40 PM (IST)
स्लामाबाद/काबूल : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान दक्षिण आशियातही दोन शेजारी राष्ट्रांमध्ये युद्ध पेटलेले आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघर्ष (Afghanistan Pakistan Conflict) सुरु असून ‘डूरंड सीमारेषेवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. नुकतेच तालिबानी सैनिकांनी पाक सीमा ओलांडून पाच महत्त्वाच्या लष्करी चौक्यांवर ताबा घेतला आहे. या भीषण संघर्षामुळे सीमावर्ती भागांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सध्या हे युद्ध भयंकर होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
03 Mar 2026 01:30 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उन्हाळ्याची सुरुवात मार्चपासून मानली जात असली तरी यंदा उष्णतेची चाहूल फेब्रुवारीअखेरच लागली. मार्चच्या पहिल्याच दिवशी नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाने जोरदार उसळी घेत नागरिकांना उन्हाच्या झळा बसल्या. नागपुरात कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
03 Mar 2026 01:20 PM (IST)
बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड म्हणून प्रवेश करणं म्हणजे केवळ दमदार उपस्थिती नव्हे, तर पहिल्याच क्षणी वेगळी छाप पाडणं असतं. संकेत पाठकने एंट्री घेतली तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाची चर्चा झालीच; मात्र त्यानंतर घडलेला एक छोटासा प्रसंग घरात वेगळाच ठसा उमटवून गेला. घरात पाऊल ठेवताच संकेतने सर्व सदस्यांचं मनापासून कौतुक केलं. “तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात आणि उत्तम खेळत आहात,” अशा शब्दांत त्याने सकारात्मक सुरुवात केली. स्पर्धा, तणाव आणि सतत बदलणाऱ्या समीकरणांच्या वातावरणात अशी थेट आणि मनापासूनची प्रशंसा क्वचितच ऐकायला मिळते.
03 Mar 2026 01:10 PM (IST)
हेल्थकेअर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सातत्याने प्रगती करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने जगातील पहिले ‘एआय हॉस्पिटल’ सुरू केले आहे. यामध्ये ४२ एआय डॉक्टर २४ तास कार्यरत असतील. ‘सिंधुआ युनिव्हर्सिटी’च्या इन्स्टट्यूट फॉर एआय इंडस्ट्री रिसर्चने विकसित केलेली ‘एजंट हॉस्पिटल’ नावाची ही सुविधा २१ वैद्यकीय विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करते. एआय-चालित वैद्यकीय सेवेच्या दिशेने चीनचे हे पाऊल एक मोठी होप मानले जात आहे. ‘एजंट हॉस्पिटल’मध्ये एआय डॉक्टर आणि परिचारिका ‘लार्ज लँग्वेज मॉडल-पावर्ड इंटेलिजेंट एजंट द्वारे काम करतात.
03 Mar 2026 01:00 PM (IST)
संपूर्ण राज्यामध्ये होळीच्या आणि धुलिवंदनाच्या सणाचा मोठा उत्साह आहे. यामध्ये राजकीय वर्तुळात देखील हालचालींना वेग आला आहे. राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ६ मार्च रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.