फोटो सौजन्य - Social Media
कर्मचारी निवड आयोग (SSC) तर्फे SSC CPO भरती 2025 साठी अधिकृत (Career) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये (CAPFs) उपनिरीक्षक (Sub-Inspector – SI) पदांची हजारो रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत संरक्षण व कायदा अंमलबजावणी विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे.
या भरतीसाठी अधिसूचना 26 सप्टेंबर 2025 रोजी जारी झाली असून अर्ज प्रक्रिया त्याच दिवशी सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज फी सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ₹100 आहे, तर SC/ST, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी फी माफ आहे. फीचे पेमेंट ऑनलाइन माध्यमातून करता येईल.
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. दिल्ली पोलिसातील SI (पुरुष) पदासाठी LMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे असून, शासन नियमांनुसार आरक्षणानुसार सवलत लागू होईल.
निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडेल – संगणकाधारित परीक्षा (Paper 1), शारीरिक मानक व सहनशक्ती चाचणी (PST/PET), संगणकाधारित परीक्षा (Paper 2) आणि वैद्यकीय तपासणी. अंतिम निवड उमेदवाराच्या एकूण कामगिरीनुसार केली जाईल. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील. Paper 2 मध्ये इंग्रजी भाषा आणि समज या विषयावर आधारित 200 प्रश्न विचारले जातील.
शारीरिक मानक चाचणीअंतर्गत पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 170 से.मी. आणि छाती 80 से.मी. (5 से.मी. विस्तारासह) आवश्यक आहे, तर महिलांसाठी उंची 157 से.मी. ठेवण्यात आली आहे. ST उमेदवारांना काही प्रमाणात सूट दिली जाईल. शारीरिक सहनशक्ती चाचणीत पुरुषांनी 100 मी. धाव 16 सेकंदांत आणि 1.6 कि.मी. धाव 6.5 मिनिटांत पूर्ण करावी लागेल, तर महिलांसाठी 100 मी. धाव 18 सेकंदांत आणि 800 मी. धाव 4 मिनिटांत पूर्ण करावी लागेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर www.ssc.nic.in भेट द्यावी. नवीन नोंदणी करून अर्ज फॉर्म योग्यरीत्या भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी. ही भरती देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारच्या सुरक्षा दलात अधिकारी म्हणून करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे.






