महाराष्ट्रातील अपडेट्स एका क्लिकवर
19 Aug 2025 09:55 AM (IST)
आशिया कपसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 : आशिया कप सुरू व्हायला फक्त २० दिवस शिल्लक आहेत. भारताच्या संघाची अजूनपर्यंत बीसीसीआयने घोषणा केलेली नाही. टीम इंडियाने मागील काही वर्षांमध्ये टी20 क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. यावर्षी आशिया कप हा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये नाही तर टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेत हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळणार नाहीत.
19 Aug 2025 09:52 AM (IST)
गणेश चतुर्थीचा सण आला की वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरते. प्रत्येक घरात आणि मंदिरात बाप्पांची स्थापना केली जाते तसेच ठिकठिकाणी भव्य पंडाल उभारले जातात. मुंबईतील गणेशोत्सवाचे दर्शन तर जगप्रसिद्ध आहेच, पण देशाच्या इतर अनेक भागांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रस्ते, चौक सजवले जातात, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांची गर्दी सर्वांना मोहून टाकते. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या काळात प्रवासाचा विचार करत असाल, तर मुंबई व्यतिरिक्तही काही ठिकाणे अशी आहेत जिथे गणेशोत्सवाची झलक वेगळ्याच उत्साहाने अनुभवता येते.
19 Aug 2025 09:50 AM (IST)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे याचा परिणाम फळ भाजी विक्रेत्यांना होत आहे. पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्यामुळे टमाटे उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव अगदीच घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाट्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळेच 400 ते 500 रुपयांना जाणारे टमाट्यांचे कॅरेट आता 1 हजार रुपयांवर येऊन पोहोचले आहे. किरकोळ बाजारात येणारे काही दिवस टमाट्याचे भाव 60 किलो इतक्या दराने विकले जाणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या ४ दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाःकार माजवला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत समुद्र खवळला असून महाराष्ट्रातील नद्यांची पातळीदेखील ओलांडली आहे आणि यामुळे सगळीकडेच धोका वाढलाय. आज सकाळच्या पावसामुळे भांडुपच्या एलबीएस मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले असून ठाण्याकडे जाणारी वाहतूक आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा