चंद्रपूर : राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षणासाठी मराठमोळ्या आयपीएस अधिकारी दिपाली मासीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिपाली मासीरकर या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिपाली रविचंद्र मासीरकर (Deepali Masirkar) 2008 च्या नागालँड बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे त्यांची नेमणूक केली आहे. दिपाली या निवडणुकीचे निरीक्षण देखील करणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. आज देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक (Election) होणार आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एनडीएकडून द्रोपती मुर्मू तर यूपीए कडून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
[read_also content=”इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/latest-news/a-terrible-accident-on-bus-coming-from-indore-to-pune-of-msrtc-nrgm-305371.html”]
दिपाली मासीरक या आवाळपूर गावातील आहेत. 2008 मध्ये त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठमोळ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला राष्ट्रपती निवडणुकीत आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळालेली आहे. ही खरोखरच चंद्रपूरसाठी एक मोठी गोष्ट आहे. मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर त्यांनी कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी सुद्धा त्यांनी काम केले असून भारत निर्वाचन आयोगाच्या संचालक पदी नियुक्ती पूर्वी नागालँडमधील कोहीना येथे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
[read_also content=”माणसात देव भेटला! संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; एक कॉल अन मध्यरात्री मुख्यमंत्री मदतीला धावले https://www.navarashtra.com/maharashtra/sensitive-chief-minister-eknath-shinde-one-a-call-the-chief-minister-rushed-to-help-in-the-middle-of-the-night-nrab-305333.html”]