सोलापूर : सोलापूर ग्रामीण क्षेत्रात मास्क अनिवार्य करण्यात येणार असून कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मकासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सुचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारनी वाढत्या कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी सुचना जारी केल्या आहेत. या पाशर्वभूमीवर आरोग्य विभागाच्या हालचालीना वेग आला आहे. व्हॅक्सिनेशन, बूस्टर डोस,कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. जिल्हयातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी होणार आहे. यासाठी डॉक्टरांचे बैठे पथक नेमण्यात आले आहे. “हार घर दस्तक” ही मोहीम पुन्हा राबविण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने नागरिकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही आदेश जारी केले आहेत.
[read_also content=”राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्या; अनिल देशमुखांचा सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात अर्ज https://www.navarashtra.com/maharashtra/allow-voting-for-rajya-sabha-elections-anil-deshmukhs-application-in-the-special-court-of-sessions-court-nrdm-288363.html”]
रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक करण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे. सध्या नव्या व्हायरसची संख्या वाढत असल्याने नव्याने निर्बंध लावण्यात येत आहेत. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे.