माथेरान हे थंड हवेचे ठिकाण वसले असुन या ठिकाणी विविध देशातील तसेच राज्यातून पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत आहेत. माथेरान हे पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण पूरक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहनाला बंदी आहे व या ठिकाणी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हेच माथेरान पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. माथेरानमध्ये असणारे वाहन तळ हे या पर्यटकांचे वाहन पार्किंग करण्यासाठी अपुरे पडते पडत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक काही पर्याय एक माथेरान घाट रस्त्यात आपले वाहने पार्किंग करून यांना माथेरानला जावे लागते. तर काही पर्यटकांना जुम्मापट्टी या आदिवासी वाढीमध्ये आपली वाहने पार्किंग करून पुढे माथेरान येथे प्रवासी टॅक्सीने माथेरानला जावे लागते.
Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल
माथेरानच्या वाहन तळाला लागून असलेला एमपी 93 हा प्लॉट शासनाच्या मालकीचा आहे.माथेरान मध्ये वाहन तळाच्या लगत असलेला एमपी ९३ या शासनाच्या मालकीच्या भूखंडाचे सपाटीकरण जेसीबी मशीन यांचा वापर करून करण्यात आले. महाराष्ट्र शासन महसुल विभाग आणि नगरपालिका हस्तांतरण झालेले नाही.तरी देखील जेसीबी मशीन लावून उत्खनन करण्याची हिंमत दाखवण्यात आल्याने खळबळ माजली आहे.हा भूखंड नगरपालिका यांच्याकडे हस्तांतरण झालेला नाही आणि तरीदेखील खोदकाम केले गेले आहे. त्याबाबत वन विभाग आणि महसूल विभाग यांनी कोणतीही कारवाई केली नाही. वाहन तळाच्या नावाखाली सपाटीकरण सुरू काम चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र एम पी 93 या प्लॉटमध्ये एक जुने इमारत आपल्याला पाहायला मिळत होते मात्र ही इमारत आता वाहन तळाच्या जागेसाठी तीन जेसीपी यांच्या सहाय्याने पाडण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करताना सुद्धा झाले वन आणि महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.एम पी 93 हा प्लॉट महसूल विभागाच्या ताब्यात असून माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या ताब्यात नाही.मात्र तरी देखील या प्लॉटमध्ये सध्या काम चालू असल्याने शासन कोणतीही कारवाई करीत नाही या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.या ठिकाणी जे मालवाहतूक घोडेस्वार होते यांना या ठिकाणी हटवून तेथे पार्किंग करण्यात येत आहे. या प्लॉटमध्ये नगरपालिकेचे हस्तांतर नसतानाही कशाप्रकारे काम चालू आहे व या कामासाठी नगरपालिका कुठल्या प्रकारे बंधने नाहीत का?असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येत आहे. तसेच माथेरानमध्ये कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात खोडकामाला परवानगी नसल्याने या ठिकाणी नगरपालिकेने एमपी ९३ या वाहनतळाच्या जागेसाठी जो प्लॉटचे काम चालू आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारे परवानगी आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.






