महाविकास आघाडीने उतरवला तिसरा उमेदवार, मिलिंद नार्वेकरांनी विधान परिषदेसाठी भरला अर्ज
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेची आमदारकीची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना विधानपरिषद या निवडणुकीची उमेदवारी देणे म्हणजे मोठा ट्विस्ट आहे. आज उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म घेतल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रज्ञा सातव उपस्थित होते. दरम्यान, महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 ते 6 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे आता नार्वेकर कसे निवडून येणार याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर ह्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,… pic.twitter.com/vPkJNo036c
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 2, 2024
विधानपरिषदेच्या निवडणुक विनाविरोध व्हाव्यात यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यानिमित्ताने त्यांनी विरोधकांशी बोलणे सुरू केल्याची चर्चा रंगली होती. मात्र उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी डाव टाकला. त्यांनी आपल्या बाजूने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली.
तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांनी विधानसभेत प्रवेश केल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संसदीय राजकारणातील हे पहिले पाऊल असणार आहे.
खरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नार्वेकरांना पक्षप्रवेशाच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. अगदी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या उमेदवारीला विरोधक मैदानात उतरल्याची चर्चा होती. फक्त त्यात तथ्य आढळत नाही. अर्थात मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असता तर तो उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला असता.