मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ सुरू होणार
मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा तयारी पूर्ण
मुंबई: महाराष्ट्र राज्याचा कौशल्य, रोजगार विभाग हा राज्यातील युवकांसाठी काही न काही विशेष योजना, कार्यक्रम घेऊन येत असतो. राज्य सरकार अनेक विविध कार्यक्रम राबवत असते. दरम्यान राज्यात देखील लवकरच ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ सुरू केले जाणार आहेत. याबाबत राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी महाराष्ट्र राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ सुरू केले जाणार आहेत. यासाथी सर्व आवश्यक बाबींचे काम पूर्ण झाले आहे. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ राज्यभरात सुरु केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमात असणारे विषय हे टेक्नॉलॉजीशी निगडीत असणार आहेत. यामध्ये तंत्रज्ञान विषयाचे अनेक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये खास करून अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर इत्यादी विषयांचा समावेश असल्याचे राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…
राज्यातील युवकांना रोजगार संदर्भात शिक्षण देणे या उद्देशाने राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ राबवले जाणार आहेत. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे हा उपक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबरल होणार आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, “या कार्यक्रमांना विश्वकर्मा समाजातील कारागीर, स्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार आहेत. स्थानिक कलाकार आणि पारंपरिक व्यवसाय या क्षेत्रातील तज्ञ हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही संख्या पुढे जाऊन 1लाख इतकी करण्याचा संकल्प राज्याच्या कौशल्य आणि रोजगार विभागाने केला आहे.
जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी ७५,००० प्रशिक्षणार्थींना ‘ मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामधून एकूण २,५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या तुकडीचे ऑनलाईन उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे, या अभ्यासक्रमासाठी रोजगार इच्छुक तरुणांनी त्वरित नोंदणी करावी अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.