सौजन्य - नवराष्ट्र टीम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता राष्ट्रवादी एकत्रीकरण होण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मात्र अजित पवार हे त्यासाठी आग्रही होते, शिवाय त्यांनी त्याबाबत अनेक बैठकाही घेतल्या होत्या. तसेच अनेक महत्वाच्या आंदरांशीही ते बोलत होते, मात्र आता त्यांच्या पश्चात एकत्रीकरण होणार का ? अशी चर्चा सुरू असताना आमदार रोहित पाटील यांनी एका सभेत याबाबत स्पष्टीकरण दिले.
महत्वाची दिली होती सूचना
रोहित पाटील म्हणाले, ‘नुकतेच अजितदादा यांनी मला निवडणुकीनंतर आपली पक्षीय परिस्थिती वेगळी असणार आहे, असे सांगून दोन्ही पक्ष एकत्रीकरण करणार असल्याचे संकेत दिले होते, त्यानुसार कामाला लाग, तुझ्या मतदार संघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या नेत्यांशी भेटून चर्चा करून योग्य त्या ठिकाणी उमेदवार देऊन सामंजस्य ठेवून निवडणुका लढा, असे अजितदादांनी सांगितले होते. तासगाव तालुक्यात मी भेटू शकणार नाही असे दादांना सांगितले होते. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यात मी संबधीताना भेटायला गेलो, मात्र त्यांनी मला कोणतही चर्चा करायची नाही, असे सांगून टाळले. कारण माझ्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याचे आधीच ठरले होते, असा आरोपही आमदार पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता केला.
हे सुद्धा वाचा : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाची इतकी घाई कशासाठी? पडद्यामागे नेमकं काय घडलं?
फक्त दादांना सांगा मी भेटून गेलो म्हणून…
पाटील म्हणाले, अजितदादा यांना आदरांजली वाहताना अत्यंत दुःख होत आहे, त्यांनी नेहमीच मला मदत केली आहे, त्यांच्या जाण्याने जे नुकसान झाले आहे ते कधीच भरून निघणारे नाही, सुरू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात त्यांनी दिलेल्या सूचना पाळण्यासाठी मी त्या नेत्यांना भेटायला गेलो, मात्र त्यांनी आमचा प्रस्थाव धुडकावून लावला, त्याची करणे ठावूक आहेत, मात्र मी त्या नेत्यांना सांगितले की, फक्त दादांना सांगा मी येऊन गेलो म्हणून, कारण मला दादांची आदरयुक्त भीती होती. असेही आमदार रोहित पाटील म्हणाले.






