अमरावती : शिंदे गटाने (shinde group) बंडखोर करत भाजपबरोबर सरकार स्थापन केले. त्यापूर्वी शिवसेनेचे ३९ आमदार नॉट रिचेबल होते. सुरुवातील आमदार सुरत, गुवाहटी, गोवा नंतर मुंबईत असा प्रवास करत शिंदे फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) झाले. यानंतर शिंदे गट व शिवसैनिक अनेक वेळा आमनेसामने आले आहेत. तसेच दोघांमध्ये वाद, भांडण हाणामारी सुद्धा झाली आहे. आज पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार संतोष बांगर (Santosh bangar) यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.
[read_also content=”तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकत गोलंदाजीचा घेतला निर्णय, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी https://www.navarashtra.com/sports/third-t-twenty-match-india-won-the-toss-and-decided-to-first-bowling-329699.html”]
दरम्यान, अमरावतील आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला आहे. ‘पन्नास खोके…एकदम ओके’ अशा घोषणा सुद्धा शिवसैनिकांकडून यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील ही घटना आहे. संतोष बांगर गाडीतून जात असताना शिवसैनिकांनी गाडी थांबवली व बांगर यांच्या वाहनावर हातांनी मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी बांगर गाडीतून न उतरता पुढे गेल्याने अनर्थ टळला.