Buldhana Farmer SBI Crop Loan Issue
Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतरही सातबाऱ्यावरील पतसंस्थेच्या बोजाचे कारण देत नवीन पीककर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी पतसंस्थेचा बोजा असतानाही पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात निर्देश दिल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निर्देशांसह लागू शासन निर्णय आणि बँकिंग नियमांनुसार कर्जप्रकरणांची तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जितेंद्र कलंत्री, संजय महाले, दिगंबर राऊत, पुरुषोत्तम अवचार, विठ्ठल कलंत्री, मुरलीधर हेलगे, प्रमोद घोटपी, प्रमोद क्षीरसागर, श्रीकांत – राऊत, शिवाजी साठे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
बँकेने शासनाचे आदेश व लागू मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपच्यावतीने बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शेती हंगामात बियाणे, खते व इतर निविष्ठांच्या खरेदीसाठी शेतकऱ्याना वेळेवर पैशांची गरज असते. पीककर्जासाठी होणाऱ्या विलंबामुळे शेती नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आ. महाले यांनी बैंक व्यवस्थापकांशी चर्चा केली. पात्र शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणी निर्माण करू नयेत आणि कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
मानोरा येथे देथील पीककर्ज थकीत झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी शासनाने आतापर्यंत ४ याद्या जाहीर केल्या. मात्र नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाच्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी देण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले तरी अद्याप एकाही पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली नसल्याने या शेतकयांची दिवाळीही गोड कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.






