मुंबई:दादरमधील(Dadar) शिवाजी पार्क हा परिसर तरुणांचा आवडता परिसर आहे. आता पावसाळा सुरू होतोय आणि याच निमित्ताने तरुणांना आकर्षित करण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात असलेल्या सेल्फी पॉइंटला (Shivaji Park Selfie Point) सजवण्यात आलं आहे. विविधरंगी छत्र्यांची सजावट करण्यात आली आहे आणि त्यामुळे हा सेल्फी पॉइंट विविध रंगांनी उजळून निघाला आहे.
मधल्या काळात हा सेल्फी पॉइंट बंद होता. व्हॅलेंनटाईन डेला मनसेचा दादर शिवाजी पार्क इथला सेल्फी पॉइंट पुन्हा सुरू झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन (selfie point inaugurated) करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale), स्थानिक आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) उपस्थित होते.
संदीप देशपांडेंच्या संकल्पनेतून सुरु झालेला सेल्फी पॉईंट
उद्घाटनाच्या दिवशी राज ठाकरेंनी कुटुंबासह सेल्फीही काढला. हा सेल्फी पॉइंट शिवाजी पार्कला भेट देण्याऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. आता हा सेल्फी पॉइंट पुन्हा सुरु करण्यात आला आहे. 2013 ते 2017 या कालावधीमध्ये मनसेचे तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉइंट सुरू झाला होता