१४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण ३६ ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण १५ पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले.देशातील शेवटच्या घटकापर्यंत मोदींचं १० वर्षांतील कार्य या माध्यामातून पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. तर मेळाव्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला असल्याचे मत महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर एक भगवं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून महायुतीचा विकास कऱण्याची धारणा या मेळाव्याच्या माध्यमातून दिसून आली, असे देखील प्रसाद लाड म्हणाले आहेत.
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी जेवढे हजारो किलोमीटर चालतील तेवढे राज्यात हजारो कार्यकर्ते हे महायुतीत सामील झाल्याचे पाहायला मिळेल, अशी टीका देखील प्रसाद लाड यांनी यावेळी केली .