मुंबई – ”लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पडेगा.” अशे विधान भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज केले. ज्यावेळी संजय राऊत यांच्या जामीन निश्चित झाला त्यानंतर कंबोज यांनी साडेपाचच्या सुमारास हे ट्विट करून हा इशारा दिला. हा इशारा संजय राऊत यांना दिल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे आपण लढत राहणार असून अनेक प्रहार झाले तरीही शिवसेना खचली नाही. मी लढत राहणार असा इशाराही राऊतांनी विरोधकांना दिला.
शिवसेनेवर एकदाही टीकेची संधी न सोडणारे मोहित कंबोज यांनी आज नाव न घेता पुन्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ”लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पडेगा” असा मजकूर लिहून आपणही लढण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी सुचक ट्विट केले आहे.
संजय राऊत यांचा फोटो मार्फ करून त्यांना महिलेच्या वेशात दाखवण्यात आले होते. पहचान कौन? असा मजकूरही या ट्वीटवर मोहित कंबोज यांनी लिहिला होता. मोहित कंबोज यांच्याशी संजय राऊत यांचा वाद सर्वश्रूत असून किरीट सोमय्या – राऊत वाद वाढल्यानंतर कंबोज यांची गाडी फोडण्यात आली होती. त्यानंतर दोघांत शाब्दीक वाॅरही रंगले होते.