मुंबई : शिवसेनेविरुद्ध शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यातून सध्या विस्तव जात नसल्याचे दिसते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही बाजूने सोडली जात नाही. त्यातच महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर भाजप आणखी सक्रिय झाल्याचे दिसते. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी विसर्जनावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला (Shivsena) आव्हान दिले आहे.
सध्या राज्याच्या चर्चेचा विषय ठेलेल्या दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी याकूब मेमनच्या कबरीला मजार बनवण्याचे कारण जनतेला द्यावे लागेल. तसेच, सर्व जनता त्यांच्या उत्तराची वाट बघत आहे. त्यांनी दसऱ्याच्या आधी स्पष्ट करावे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
मोहित कंबोज यांनी मुंबई बॉंम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याच्या कबरीचे करण्यात आलेल्या सुशोभिकरणावर शिवसेनेला सवाल केला आहे. त्यामुळे या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.