पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली होती. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. मान्सूनचा प्रवास किमान १० जूनपर्यंत तरी थांबणार असल्याचा अंदाज आहे. या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान असण्याचा अंदाज आहे. त्यामुळ तापमानात वाढ होणार आहे. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची राहिल तर मराठवाडा आणि खानदेशात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे.
Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणीकपात
पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये २ ते ४ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २ जून रोजी मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुढचे ४८ तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सूनच्या आगमनापासून इशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अरूणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीमआणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे दीड हजार पर्यटक अडकले आहेत. तर मेघालयमधील भुस्खलनात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ पर्यटकांचा शोध अद्यापही सुरू आहे. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाशी संबंधित घटनांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.
दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार
माण तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेकडो गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेतांचे, घरांचे, गुरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कोणतेही बाधित गाव सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.