फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पुण्यातील हिट ॲंड प्रकरणाप्रमाणे अपघात झाला. यामध्ये मिहीर शाह या तरुण आरोपी असून त्याचे वडील राजेश शहा अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, आरोपीचे वडील राजेश शहा यांना काल जामीन देखील मिळाला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शिंदे गटाशी संबंधित आहे. राजेश शाह हे शिंदे गटाची निगडित आहेत. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना वरळी हिट ॲंड प्रकरणावरुन निशाणा साधला आहे.
सुरतला गेला आहे की गुहाटीला लपवला?
वरळी हिट ॲंड रन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपी त्याचा मुलगा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ते ठाणे जिल्ह्यातील आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत. 24 तासांत काय त्यांना पोलिसांनी अटकच कशी केली. पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला खून करून अटक होते? कुठे आहे मुख्य आरोपी तो फरार झाला आहे ना. दारूच्या नशेत एका मराठी महिलेला गाडीखाली चिरडून हा मिहीर शहा मुंबई पोलिसांच्या हातून सुटतो कसा, कुठे गेला आहे तो? सुरतला गेला आहे की गुहाटीला लपवला आहे, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावा. या मुंबई महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही, हे मला खात्रीनं सांगावसं वाटतं, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सिद्धिविनायक कोणालाही आशीर्वाद देत नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावरुन देखील संजय राऊत संतापले. ते म्हणाले, ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करतंय पाप कोण करतय? चोऱ्या, लबाड्या कोण करतंय? कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतेय? हे त्यांना कळत असतं. ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेला आहे सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिला आहे.