पाकिस्तानला मोठा झटका! सौदी अरेबिया JF-17 लढाऊ विमानाचा करार केला रद्द; अमेरिकेच्या दबावामुळे माघार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
JF-17 लढाऊ विमानेही पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या संयुक्त भागीदारीत विकसित करण्यात आली होती. या लढाऊ विमानांच्या विक्रीसाठी सध्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहक शोधत आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीमन मुनीर यांनी या विमानांची ताकद आणि क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवली आहे.
यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ही लढाऊ विमाने पाकिस्तान सौदी अरेबियाला (Saudi Arabia) विकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. सौदी अरेबियाने या विमानांची खरेदी रद्द केली आहे. सौदी अरेबियाच्या या विमांनाच्या खरेदीमुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फायदा जाला होता. याशिवाय सौदी तुर्कीकडून देखील KAAN लढाऊ विमानांसाठी करार करणार असल्याचे संकेत मिळाले होते.
दरम्यान सौदी अरेबियाच्या पाकिस्तान आणि तुर्कीकडून शस्त्रखरेदीमुळे अमेरिकेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. चीनचा आखाती देशांमध्ये वाढता प्रभाव अमेरिकेला खटकू लागला होता. यामुळे डोनाल्ड ट्रम्प सतत सौदी अरेबियावर अमेरिकेकडून F-35 लढाऊ विमानांच्या खरेदीची दबाव टाकते होते. तसेच सौदी अरेबिया अमेरिकेत मोठी गुंतवणूक करणार होता.
परंतु सौदी अरेबिया आपल्या देशाच्या संरक्षणासाठी कोणा एका देशावर अवलंबून राहू इच्छित नव्हता. यामुळे तुर्की आणि पाकिस्तानसोबत सौदीने लढाऊ विमानांच्या शस्त्र खरेदीसाठी चर्चा सुरु केली होती.
यापूर्वी सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्यासाठी भागीदारी देखील केली होती. सप्टेंबरमध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करत नव्या धोरणात्मक समीकरणांना बळकटी दिली होती. या करारात एक मोठी तरतूद करण्यात आली होती. ज्यामध्ये दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशवर हल्ला झाला तर तो दुसऱ्या देशावरही हल्ला मानला जाईल. यामुळे दोन्ही देशांच्या दीर्घकालीन लष्करी सहकार्याला अधिकृत मान्यता मिळाली होती. पण आता सौदीच्या विमानांच्या खरेदी करार रद्द केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
Ans: सौदीने JF-17 या चीनी बनावटीच्या लढाऊ विमानांची खरेदी पाकिस्तानकडून रद्द केली आहे.
Ans: तज्ज्ञांच्या मते, सौदी अरेबियाने अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे.






