फोटो सौजन्य: गुगल
रेल्वेच्या काही तांत्रिक बाबी दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. लोकलचे सिग्नल दुरुस्ती, तसंच रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम देखील करण्यात येणार आहे. यामुळे प्रवााश्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मार्गांवर असलेल्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक रेल्वेप्रशासनाकडून जारी करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक अपडेट सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड येथे अप आणि डाउन धीम्या मार्गावर लोकल धावतील . सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन स्लो मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरुन वळवल्या जाणार आहेत. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाउन स्लो मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या दरम्यान लोककच्या फेऱ्या नियोजित वेळेपेक्षा उशीराने होणार आहेत. १५ मिनिटे उशिराने गाड्या धावणार आहेत.
सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबतील आणि माटुंगा स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ट्रान्स-हार्बर लाईन मेगा ब्लॉक अपडेट सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान यूपी आणि डीएन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक अपडेट सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठीच्या डीएन लाईन सेवा आणि सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत पनवेल/नेरुळ/वाशीहून सुटणाऱ्या ठाण्यासाठीच्या अप लाईन सेवा रद्द राहतील.
अप आणि डाउन जलद वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. अप-डाउन जलद मार्गावरील लोकल अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मात्र राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द केल्या आहेत. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या या नियोजित वेळेच्या उशीराने होणार आहे. मात्र रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.