बंदची एक हाक आणि संपूर्ण मुंबई बंद हे मुंबईकरांनी आजवर अनेकदा अनुभवलं आहे. हेच ऐआता पुन्हा एकदा होत असल्याचं अजून येत आहे. कधी पावसामुळे तर तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा मुंबई लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांच्या नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आज झालेल्या रेल रोकोमुळे नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा फटका मुंबईतील नोकरदारा वर्गाला होत असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. याचं कारण म्हणजे मराठा आंदोलकांनी आज मोटरमोनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रेल्वे ठप्प झाल्याने रेल्वेस्थनकात प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस अजून आंदोलनाने रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलनातील काही जणांनी अतिरेक करत उभ्या असलेल्या लोकलमधील मोटारमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशीराने धावत असून दादर, कुर्ला आणि परळ स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात ठीय्या मांडत आंदोलकांनी रेल्वे थांबवली. तसंच रेल्वे स्थानक परिसरात कबड्डी आणि खोखो खेळत प्रवाशांच्या नाकी नऊ आणले. आंदोलन करताना रेल्वे स्थानाकात कोणत्याही प्रकारे प्रवाशांचा खोळंबा होईल अशा प्रकारे वागणूक करु नका, रेल्वे स्थानकात कोणताही गोंधळ घालू नका असं मनोज जरांगेंंच्या निर्देशाचे तीन तेरा करत जमावाने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने सखोल नियोजन केले आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करून प्रवासी व आंदोलकांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे पोलीस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्था केली आहे. नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीपी राकेश कलासागर यांनी केले.
आंदोलकांनी आक्रमक होऊन मोठ्या संख्येने भगवा झेंडा दाखवत घोषणाबाजी केली. रेल्वेस्थानकात तैनात असलेल्या सीआरपीएफचे 300 जवान तैनात करण्यात आले. ट्रेनच्या टपावर चढून आक्रमकपणे आंदोलन होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात रेल्वे पोलीसांना शर्थीेचे प्रयत्न करावे लागले. मानवी मनोरे रचून ट्रेनवर चढणाऱ्या या आंदोलकांना ओव्हरहेड वायरपासून लांब राहण्याचं आवाहन देखील रेल्वे यंत्रणेकडून करण्यात आलं. जस जशी वेळ पुढे सरकत आहे त्याप्रमाणे मराठा आंदोलकांनी मुंबईतल्या ठिकठिकाणी नाकाबंदी आणि रेलरोको करण्यास सुरुवात केली आहे.सीएसएमटीप्रमाणे वाशी रेल्वेस्थानकात देखील मराठा आंदोलकांनी हुल्लडबाजी पाहण्यास मिळावी. याशिवाय बेलापूर रेल्वेस्थानक परिसरात देखील मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्य़ाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.