कोल्हापूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्यापासून कोकण दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज करवीरनिवासनी अंबाबाईचे दर्शन घेतले. राज ठाकरे यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळं वाहतूक कोंडीला देखील लोकांना सामोरी जावे लागले. दरम्यान, कोकण दौऱ्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोल्हापुरात (kolhapur) पत्रकार परिषद (Press conference) घेत, विविध विषयांवर भाष्य केले. तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र्य लढवणार असल्याचे सुद्धा यावेळी राज ठाकरेंनी सांगितले.
[read_also content=”वेदांताबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर माझ्याशी डिबेट करावी, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-should-debate-with-me-in-front-of-the-media-regarding-vedanta-aitya-thackeray-challenge-to-cm-eknath-shinde-349562.html”]
बालेकिल्ले हलत असतात, पुढेही हलत राहतील
दरम्यान, पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठलाही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. कुठल्याही एका पक्षाचा बालेकिल्ला कायम राहत नाहीय, बालेकिल्ले हलत असतात, पुढेही हलत राहतील असं राज ठाकरे म्हणाले. तसेच मुंबई महानगर पालिका मनसे स्वतंत्र्य लढणार आहे. मी माझ्यासाठी व पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी काम करत असतो. दुसऱ्यासाठी नाही. माझ्या राजकीय पक्षाची वेगळी भूमिका आहे. आमची लढाई वेगळी आहे, माझ्यासोबतची 95 ते 98 टक्के लोकं नवीन आहेत, काँग्रेसमधून फूटून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, तेव्हा त्यांच्यात अनेक अनुभवी नेते होते.
आम्हाला थोडा वेळ लागेल…
शिवसेनेला आधी लोकं म्हणायचे की, शिवसेना हा मुंबईपुरता मर्यादित पक्ष आहे. कित्येक वर्षानंतर शिवसेनेला मुंबईत सत्ता मिळाली. पक्षांचा हळूहळू विस्तार होत असतो. माझ्या पक्षाला फक्त आता 16-17 वर्ष झाली आहेत. जास्तीत जास्त पोकळी भरुन काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. इतर पक्षांचाही विचार केला पाहिजे. ज्यांना आमची भूमिका खटकते ते आमच्यावर टिका करताहेत. पण आमचा पक्ष विस्तारासाठी व सत्ता येण्यासाठी थोडा वेळ लागेल असं राज ठाकरे म्हणाले.
अचनाक प्रश्न उफाळून येतो?
सीमाभागातील प्रश्न अचानक वर कसा येतो हे समजत नाही, सीमावाद अचानक कसा उफाळून येतो, याचा तुम्ही पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. मूळ विषय टाळण्यासाठी सीमाप्रश्न निर्माण केला नाही ना, अशी शंक येते असं राज ठाकरे म्हणाले.
काहींना पद मिळतं, पण पोहोच येत नाहीय
राज्यपालांवर काय बोलायचे त्यांचे पद मोठे आहे, म्हणून मी काही बोलू शकत नाहीय, काहींना पद मिळतं, पण पोहोच येत नाहीय, लक्ष विचलित करण्यासाठी राज्यपालांना कोणी हे बोलायला सांगत का? हा प्रश्न आहे. माध्यमांनी नको त्या माणसांना प्रसिद्धी देऊ नये, असं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे, अब्दुल सत्तारांवर टिका
दरम्यान, उद्धव ठाकरेंची मिमिक्री केला असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला असता, प्रश्न मिमिक्रिचा नव्हता. जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर होती, तेव्हा तब्येतीचं कारण देऊन लोकांना भेटत नव्हती, मुख्यमंत्री पद गेल्यावर आता कसे बाहेर पडले. आरोग्याची चेष्टा केली नाही, तर त्यावेळच्या परिस्थितीवर बोललो, अस राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काहीजण मुद्दाम प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा दाखला दिला.
चित्रपटावर आक्षेप चुकीचा
‘हर हर महादेव’ चित्रपट बघायचा आधी चित्रपटावर आक्षेप कसा काय घेतला जातो. चित्रपट बघून काही आक्षेप नोंदवला असता तर ठिक आहे, पण चित्रपटात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाहीय. राज्यात अलीकडे जातीचा द्वेष आता जास्त पसरवला जातोय, मतांसाठी काही लोकं जातीचा वापर करत आहेत. असं राज ठाकरे म्हणाले.