पनवेल हादरलं! ६३ वर्षाच्या वृद्धाने ४ वर्षांच्या चिमुरडीवर केला अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट
पनवेलमध्ये संतापजनक घटना घडली आहे. ४ वर्षांच्या चिमुरडीवर ६३ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केला आहे. पनवेलमधील शेडुंगमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलं आहे. हरी असं अटक करण्यात आलेल्या वृद्धाचं नाव आहे. या घटनेनंतर पनवेलमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील शेडुंगमध्ये 4 वर्षांची पीडित मुलगी आणि आरोप हरी एकाच सोसायटीमध्ये राहतात. दरम्यान हरिने या सोसायटीच्या लिफ्टच्या बाजूला असलेल्या भिंतीलगत मुलीवर अत्याचार केला. हरी 63 वर्षांचा असून त्याने घृणास्पद कृत्य केले आहे. त्यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हरी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल तालुका पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपी हरी याला अटक केली आहे.
आरोपीला पनवेल न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करत आहेत. या घृणास्पद प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. लोकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
आसाममधील कछार येथे एका २८ वर्षीय ड्रायव्हरने त्याच्या शेजाऱ्याच्या घरात घुसून ३० वर्षीय महिलेवर तिच्या दोन मुलांसमोर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेच्या शरीरावर अॅसिडसारखे रसायन ओतले आणि पळून गेला. ही महिला सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (एसएमसीएच) जीवनमरणाशी झुंज देत आहे. महिलेच्या मोठ्या मुलाने (६ वर्षांचा) दिलेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
बलात्कार पीडितेच्या पतीने सांगितले की, आरोपीने यापूर्वीही परिसरातील महिलांशी गैरवर्तन केले होते. पतीच्या म्हणण्यानुसार, तो विवाहित महिलांना लक्ष्य करतो, त्यांचे नंबर विचारतो आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी देखील लिहितो. अनेक प्रसंगी, स्थानिक लोकांनी बैठका घेतल्या आणि अशा समस्या सोडवल्या, परंतु त्यांनी या उपक्रमांना थांबवले नाही.
२३ जानेवारी रोजी पतीने धोलाई पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता अंतर्गत एफआयआर दाखल केला. धोलाई पोलिस स्टेशनचे प्रभारी जोनपन बे म्हणाले की ते आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तो फरार आहे पण आमची शोध मोहीम सुरूच आहे. पीडितेवर उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर आम्ही तिचे जबाब नोंदवू, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.