धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा; याचिकाकर्त्यांनाच ठोठावला १ लाखांचा दंड
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्घृणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. त्यानंतर त्यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक नेत्यांची नावे आता समोर येत आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्यातील मराठवाड्याच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासह विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी आपली वर्णी लागावी यासाठी पाऊले उचण्यास सुरुवात केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. असे जरी असले तरी सध्या हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहिल, असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, माजी क्रीडामंत्री संजय बनसोड हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. भाजपमधील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. केवळ निवडणुकीपुरते शरद पवार गटात गेलेले सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. धाराशिवसह मराठवाड्यातील विस्तारासाठी पदवीधर मतदारसंघातील चव्हाण उपयोगी पडू शकतात, असा दावा केला जात आहे. प्रकाश सोळंके हेही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचाही या पदासाठी दावा असू शकतो.
राष्ट्रवादीचे लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही संधी मिळू शकते. रिक्त जागा भरताना मराठवाड्यातून वजा झालेले मंत्रिपद याच भागात राहावे, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामुळे एका रिक्त पदावर खूप जणांचा दावा असू शकतो. तशा पडद्यामागच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. यातील काही इच्छुकांनी अजित पवार यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. दरम्यान, एकाच जिल्ह्यातील दोन मंत्री पदे देण्याचा असमतोल दूर करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याची चर्चा सुरू झाली.
सध्यातरी अजित पवारांकडे असणार मंत्रिपद
धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण दिले आहे. या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानुसार, काही नावेही समोर आली आहेत. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार स्वत:कडे ठेवला आहे.