बीड : बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा असताना ठाकरे गटातच अंतर्गत राजकारणच समोर आल्याच दिसत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव ( Appasaheb Jadhav) यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांना मारहाण केल्याचा दावा केल्याने काल एकच खळबळ उडाली होती. मात्र, मात्र मला मारहाण झाली नाही, विरोधकांकडून महाप्रबोधन यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती. या प्रकरणी आता ठाकेर गटाकडून कारवाई करण्यात आली असून अप्पासाहेब जाधवांची उद्धव पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
[read_also content=”मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा सागरी पूल डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता! मे अखेरीस 16.5 किमी पुलावरील डेक टाकण्याचं काम होणार पुर्ण https://www.navarashtra.com/maharashtra/the-decking-work-on-the-16-5-km-between-mumbai-to-navi-mumbai-bridge-will-be-completed-by-the-end-of-may-nrps-401427.html”]
बीडमध्ये महाप्रबोधन यात्रे होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल बिडमध्ये सायंकाळच्या सुमारास सुषमा अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे सभास्थळाची पाहणी करत होते. यावेळी तिथे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही उपस्थित होते. यावेळी इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणं झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आप्पासाहेब जाधवही यांनी अंधारे यांना चापट लगावल्याचा दावा केला होता. त्यानंतर सगळीकडे चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, या प्रकरणी कारवाई करतलगेच पक्षाने जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
आप्पासाहेब जाधव म्हणाले होते की, आम्ही सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचे झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली होती. तर, सुषमा अंधारे यांनीही असं काहीही घडलं नसून मला मारहाण झाली नाही, विरोधकांकडून महाप्रबोधन यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी प्रतिक्रिया दिली होती.