दलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप
बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील ४ आरोपींना ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ वर्षांनंतर मोहन राऊत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. तब्बल ११ वर्ष हा खटला विशेष मोक्का न्यायालयात सुरू होता. आरोपींना जन्मठेपाची शिक्षा मिळाल्यानंतर राऊत कुटुंबीयांनी ‘अखेर आम्हाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केल्या आहेत.
मोठी बातमी! पिंपरीत भरधाव वेगातील क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू, देहू-आळंदी रस्त्यावरील घटना
23 मे 2014 रोजी बदलापुरमधील माजी नगरसेवक आणि तत्कालीन शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे उपशहरप्रमुख योगेश राऊत याने रचल्याचं समोर आलं होतं. अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं होतं. आरोपींना अटक केल्यानंतर योगेश राऊतसह सात जणांवर मोक्का लावण्यात आला होता.
११ वर्ष या प्रकरणाची विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज ठाणे कोर्टानं या प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर राऊत कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलंय. आमच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मोहन राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांनी दिली आहे.
एकाशी लग्न, दुसऱ्यावर प्रेम, तिसऱ्याशी…..! प्रेम, धोका आणि मर्डर, एका प्रेमाची रक्तरंजित कहाणी
माजी नगरसेवक मोहन राऊत हत्या प्रकरणातील आरोपींचं नाव देखील हाती आले आहेत. या प्रकरणातील चंद्रकांत म्हसकर, गंगाराम लिंगे, योगेश राऊत, अजय गुरव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच जन्मठेपेसह 5 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.