डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
मुंबई : दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. यावेळी स्थानकातील प्रवाशांनी त्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला. दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी संध्याकाळी महिला दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर लोकल पकडण्यासाठी थांबली होती. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अगदी जवळून जात तिचा विनयभंग केला. महिलेने तत्काळ आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांनी आरोपीला पकडले. संतप्त प्रवाशांनी त्याला चोप देऊन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमिदुल्ला मुख्तार शेख (२९) असे अटक आरोपीचे नाव असून, तो कुर्ल्यातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी लहान-मोठे कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो. तो मूळचा झारखंडमधील रहिवासी आहे.
रेल्वे पोलिसांचा विशेष बंदोबस्त
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त तैनात केला होता. त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करून ही पथके स्थानकांवर गस्त घालत होती. महिला प्रवाशांची छेडछाड व त्रास देणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. धावत्या गाड्यांवर पाण्याचे फुगे मारू नये यासाठी रेल्वे रूळानजीकच्या झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.
हातात चाकू घेऊन फिरणाऱ्यांना नागरिकांनी चांगलंच चोपलं
दुसऱ्या एका घटनेत, रफिक खान रशीद खान हे शुकवारी (दि. 14) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास इतर कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. यावेळी चित्रा चौकात चार तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दहशत निर्माण करणाऱ्या चार तरुणांना काही लोक मारहाण करत होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शुभम साहू, नितीन साहू, हर्ष साहू आणि गौरव साहू यांना ताब्यात घेतले.