“रोज मरे त्याला कोण रडे” अशी अवस्था कायमच मुंबईकरांची वाहतूक कोंडी आणि लोकलच्या उशीरा येण्याने होत असते. आधीच लोकलची गर्दी कमी की काय म्हणून पश्चिम रेल्वे मार्गावरील २५० पेक्षा जास्त लोकल फेऱ्य़ा रद्द केल्या आहेत. माहिम आणि वांद्रे रेल्वेस्थानकादरम्यान मिठी नदीवर असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पुल क्रमांक 20 चं दुरुस्तीचं काम सुरु आहे. याचा परिणाम म्हणजे कांदिवली स्थानकात सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना गर्दीचा मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास प्रवाशांना यासगळ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी कामावर जाणाऱ्य़ा चाकरमान्यांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
वांद्रे – माहिम स्थानकादरम्यान असलेला हा पुल 1888 च्या काळात बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुलाच्या पुर्नबांधणीसाठी 25 आणि 26 जानेवारीच्या मध्यरात्री 11 तेसकाळी 8:30 यावेळेत अप आणि डाउन स्लो मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. , यासोबतच डाउन फास्ट दुपारी 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ब्लॉक राहील. या कालावधीत 250 हून अधिक लोकल ट्रेन सेवा रद्द करण्यात आल्या असून 150 लोकलच्या फेऱ्या होणार आहेत. दरम्यान पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे कांदिवली स्थानकात प्लॅठफॉर्म 1 आणि 2 या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. य़ा मेगाब्लॉकमुळे चर्चगेट आणि बोरिवली विरारकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.
ED Mumbai Raid: टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ED ची एन्ट्री; मुंबई आणि जयपूरसह 13 ठिकाणी छापेमारी
यासगळ्यावर संतप्त झालेल्या प्रवााशांनी होणाऱ्या गैरसोय़ीबाबत रेल्वेप्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. रेल्नेच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. बोरिवली स्थानकात सकाळी कामाच्या वेळी कोणत्याही प्रकारची तत्काळ माहिती प्रवाशांना प्रशासनानकडून दिली नााही. त्यामुळे चाकरमान्यांनी रेल्वे प्रशासनाच्या हलर्जीपणावर ताशेरे ओढले आहे. तीन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेप्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र हा मेगाब्लॉक रात्री असल्याचं बैठकीत सांगितलं होतं. पुल बांधणीच्या कामामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्याांना नाहक त्रास सहन कारावा लागत आहे.मिठी नदी पात्रावरील या पुलाला बरीच वर्ष होऊन गेली आहेत, त्यामुळे त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव हाती घेण्यात आला आहे. मात्र या पुलाच्या बांधकामासाठी पश्चिमम मार्गावरील लोकल फेऱ्या कमी केल्या असल्या कारणाने प्रवाशांना खोळंबा होत आहे.