लालबागच्या राजाचे गिरगाव चौपटीत विसर्जन, राजाला भाविकांचा भक्तिभावाने निरोप, चौपाटीवर भाविकांचा जनसागर (फोटो सौजन्य - सौजन्य -सौशल मिडीया)
मुंबईचा मानाचा गणपती असलेला लालगबाच्या राजाला भाविकांनी निरोप दिला आहे. शेवटची आरती करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, लालबागच्या राजाचा विजय असो, असा जयघोष करत लालगबाच्या राजाला भाविकांनी निरोप दिला आहे. राजाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते. राजाला तराफ्यावर बसवून अत्यंत जड मनाने भाविकांनी त्यांच्या लाडक्या राजाला अखेर निरोप दिला आहे. काल सकाळी लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर आता अखेर भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप दिला आहे. लालगबाच्या राजासोबतच इतर गणेश मूर्ती देखील गिरगाव चौैपटीत दाखल झाल्या होत्या.
हेदेखील वाचा- ‘लालबागच्या राजाला’ साश्रूपूर्ण निरोप, विसर्जनाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गिरगाव चौपटीवर आले होते. राजाच्या विसर्जन सोहळ्या अनंत अंबानी देखील सहभागी झाले हेते. आपल्या लाडक्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गिरगाव चौपाटीवर विसर्जनापूर्वी लालबागचा राजाची आरती संपन्न झाली. यावेळी गिरगाव चौपाटीवर अलोट जनसागर जमला होता. लालबागचा राजाची आरती सुरु असताना गिरगाव चौपाटीवरील वातावरण अक्षरश: भारले होते.
हेदेखील वाचा- Kartik Aaryan: कार्तिक आर्यन ‘लालबागचा राजा’च्या चरणी लीन
लालबागचा राजासोबतच चिंचपोकळीचा चिंतामणी देखील गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. चिंतामनीला देखील भाविकांनी आपल्या जड:अंतकरणाने निरोप दिला आहे. चिंतामनीचे विसर्जन काल रात्रीच होणार होते, मात्र काल रात्री 11 वाजता समुद्राला भरती आली होती. त्यामुळे गणेश मंडळांना काही काळ गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले नव्हते. त्यामुळे अनेक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन अद्याप बाकी आहे. बाप्पााला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
तब्बल 19 तासांच्या भव्य मिरवणूकीनंतर भाविकांनी आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला आहे. काल सकाळी 11 वाजता राजाच्या विजर्सन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर राजा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. राजासोबतच लाखो भाविक देखील चौपाटीवर आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी आले होते.
राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर त्याची आरती करण्यात आली. त्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात त्याचे विसर्जन केले. येथील कोळी बांधवांच्या अनेक होड्या लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या. लालबागचा राजाला निरोप देताना कार्यकर्ते आणि गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. लालबागचा राजाला तराफ्यावर बसवून भाविकांनी त्याचे विसर्जन केलं. तराफ्यावर ५ स्कुबा डायव्हर्स होते. ज्यांच्या माध्यमातून हायड्राॅलिक क्रेनच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. यावेळी प्रत्येक भाविकाचे डोळे पाणावले होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, लालबागच्या राजाचा विजय असो, असा जयघोष करत भाविकांनी अखेर आपल्या लाडक्या रााजाला निरोप दिला.