मनोज जरांगेंना सरकारचा ड्राफ्ट आधीच माहिती होता- जरांगेंवर कुणी केले गंभीर आरोप
गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबईत दाखल झाले. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी ५ दिवसांचे उपोषण सुरू केलं. पण पाचव्या दिवशी राज्य सरकारच्या मराठी आरक्षणाच्या उपसमितीने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि मुंबईत आलेले लाखो मराठा आपपल्या गावी परतले. पण त्यानंतही राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे गंभीर आरोप केले आहेत.
“मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण हा रथ आपण एकटेच ओढतोय असं जरांगेंना वाटतं आहे. मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करत आहेत. ते सर्व मराठा समाजाचे नाही तर फक्त कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. मनोज जरांगे यांची एकही मागणी वैद्य, कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची दिसत नाही. मनोज जरांगे यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही. मनोज जरांगे चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून मराठा समाजाचे नुकसानच करत आहेत. असा आरोप डॉ. संजय लाखेपाटील यांनी केला आहे.
संजय लाखे म्हणाले, “मनोज जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी करत आहेत. पण मराठा समाजातील घटनात्मक माहिती आणि अभ्यास असलेल्या लोकांनाच ते टार्गेट करण्याचं काम करत आहेत. मुंबईतील आंदोलनादरम्यान राज्य सरकारच्या उपसमितीने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता. पण हा मराठा समाजासाठी नव्हे तर सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळण्यात आला. त्यांनी आधीच सरकारसोबत ड्राफ्ट तयार केला आणि नंतर अभ्यासकांना बोलावून त्यावर चर्चा करण्याचे नाटक केले, ही समाजाची फसवणूक आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
भारताचं फेमस बिस्कीट Parle-G च्या पॅकेटवरील ती मुलगी कोण? 65 वर्षांपूर्वीच ते सत्य आलं समोर…
आरएसएसच्या अजेंड्याचा उल्लेख करत डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले, “जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना कुठलाही सपोर्ट मिळणार नाही. अन्यथा, देवेंद्र फडणवीस तीन महिनेही मुख्यमंत्री राहू शकत नाहीत. RSS च्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत. पण मराठा समाजाशी राधाकृष्ण विखे पाटील यांनीही बेईमानी केली. पण त्यांची ही मागणी घटनात्मक, कायदेशीर किंवा वैद्य ठरत नाही,” असेही लाखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या जीआरवरून राज्यातील मराठा समन्वयकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनीही सडकून टीका करत गंभीर आरोप केले आहेत. डॉ. लाखे पाटील यांनी म्हटलं की, “मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी करत आहेत. मुंबई आंदोलनाच्या वेळी शासनाने दिलेला ड्राफ्ट त्यांना आधीपासूनच माहीत होता. तरीदेखील त्यांनी केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळला. तसेच, घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या व्यक्तींना मनोज जरांगे मुद्दाम टार्गेट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा आरएसएसचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत.”