रोज परप्रांतीयांची गर्दी सहन करतो..; मराठा आंदोलकांना मनसेचा पाठिंबा
Maratha Reservations: आझाद मैदान तातडीने रिकामे करा..; जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस
दरम्यान, आंदोलकांकडून विविध सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली जात असल्याचे आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात झालेल्या प्राथमिक सुनावणीत प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात तोडगा निघावा, यासाठी चर्चेची हालचाल सुरू असून आंदोलक मात्र “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” या भूमिकेवर ठाम आहेत.
याच पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी अडचण निर्माण होत असल्याचा दाखला देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. “मराठा समाजाला आंदोलनाचा अधिकार आहे, पण मुंबई ठप्प करण्याचा आणि मुंबईकरांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दांत न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली. तसेच विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मंगळवारी (२ सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे व बस स्थानकं मोकळी आणि स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत.
Beed Crime: बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी उचलले टोकाचे पाऊल, बीडच्या अंबाजोगाईती
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आरोग्यावर वैद्यकीय पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे. आंदोलक मात्र “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” या भूमिकेवर ठाम असून, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदानवगळता मुंबई रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलका नवी मुंबईतील खारघर याठिकाणी पोहचू लागले आहेत. न्यायालयाने आणि प्रशासनाने मराठा आंदोलकांना खारघरमध्ये आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. पण त्याचवेळी मराठा आंदोलनाला विरोध करणारे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी फेसबूकवर पोस्ट शेअऱ करत त्यांची भूमिका मांडली आहे. “ आपण रोज परप्रांतीयांचाी गर्दी सहन करतो, मात्र आज आपला मराठी बांधव मुंबईत आला तर त्यांचा थोडासा त्रास अभिमानाने सहन करू.” असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच, मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो. आता आपले हक्काचे मराठी भाषिक आले आहेत, तर त्यात वावगं काय आहे? थोडासा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करू, आमचे राज ठाकरे नेहमीच सांगतात, मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे!”






