शासकीय, निमशासकीय कार्यालयांना मिळणार सुट्टी (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रकनिर्गमित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शनिवारी, दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि शनिवारी, दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती.
तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुट्ट्यांऐवजी दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा व दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे शासन शुद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कधी आहे नारळी पौर्णिमा?
समुद्र देव वरूण यांना समर्पित केलेला हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेचा सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. जाणून घ्या यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे, काय आहे शुभ मुहूर्त आणि नारळी पौर्णिमेचा इतिहास.
यंदा श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता होईल आणि या पौर्णिमेची समाप्ती शनिवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता होईल. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 7.27 ते 9.7 वाजेपर्यंत असेल. तर दुपारी मुहूर्त 12.26 ते 2.6 वाजेपर्यंत राहील.
Narali Purnima 2025: सण आयलाय गो… कधी आहे नारळी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व
नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करुन त्यात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, या दिवशी समुद्र देवतेला प्रसन्न केल्याने मच्छिमारांना जलमार्गात सुरक्षितता मिळते आणि त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात. या दिवशी मच्छीमारांसाठी नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात होते, कारण या वेळेनंतर समुद्राच्या लाटा आणि वारे अनुकूल मानले जातात.