मुंबई मेट्रोचा वेग मंदावला! दहिसर-अंधेरी मार्गावर तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल
मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान महा मुंबई मेट्रोच्या यलो लाईन (मार्ग २अ) वरील सेवेला मोठा फटका बसला. दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंडपेश्वर स्थानक परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही काळ मेट्रो सेवा प्रभावित झाली. यामुळे दहिसर-अंधेरी मार्गावरील वाहतूक मंदावली आणि अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार्यालयीन वेळ असल्याने या बिघाडाचा मोठा परिणाम प्रवाशांवर झाला.
Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. तर डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व या विभागात एकाच मार्गिकेवर (Single Line) दोन्ही दिशांनी मेट्रो गाड्या चालवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
प्रवासी सूचना महा मुंबई मेट्रो मार्ग २अ वर दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव मेट्रो वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सेवा अखंडित ठेवण्यासाठी मेट्रो सेवा पुढीलप्रमाणे सुरू आहेत: •अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी दरम्यान मेट्रो सेवा… — Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) July 4, 2026
मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली नसली, तरी तांत्रिक बिघाडामुळे काही गाड्या उशिराने धावत असून वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिघाड दूर करण्यासाठी मेट्रोचे तांत्रिक पथक युद्धपातळीवर काम करत असून शक्य तितक्या लवकर नियमित सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून बिघाड दूर होताच सर्व सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. तर डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व या विभागात एकाच मार्गिकेवर (Single Line) दोन्ही दिशांनी मेट्रो गाड्या चालवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली नसली, तरी तांत्रिक बिघाडामुळे काही गाड्या उशिराने धावत असून वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिघाड दूर करण्यासाठी मेट्रोचे तांत्रिक पथक युद्धपातळीवर काम करत असून शक्य तितक्या लवकर नियमित सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून बिघाड दूर होताच सर्व सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






