(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ गेल्या काही काळापासून जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. मूळतः एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अडचणी येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता अभिनेत्याच्या प्रोडक्शन हाऊसने एक निवेदन जारी करून अशा बातम्या खोट्या असल्याचे फेटाळून लावले आहे.
‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!
सलमान खानच्या चित्रपट निर्मिती संस्थेने, सलमान खान फिल्म्सने, इन्स्टाग्रामवर एक निवेदन जारी करून अशा अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेटही शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर हे निवेदन शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, “‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाला CBFC कडून कोणत्याही समस्या आल्या आहेत किंवा त्याचे प्रमाणपत्र रोखण्यात आले आहे, हे सर्व दावे खोटे आहेत. चित्रपट अद्याप प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीकडे सादर केलेला नाही.”

चाहत्यांना पुढे आवाहन करताना असे लिहिलं गेलंय, “असे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत. आम्ही प्रसारमाध्यमे आणि व्यक्तींना विनंती करतो की त्यांनी पडताळणी न केलेली माहिती पसरवू नये. चित्रपटाशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती सलमान खान फिल्म्सकडून केवळ त्यांच्या अधिकृत माध्यमांद्वारेच दिली जाईल.”
सलमान खानचा हा चित्रपट जून २०२० मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे. सलमानने यात संतोष बाबू नावाच्या कर्नलची भूमिका साकारली आहे. सलमानला सैनिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, त्यांची प्रतीक्षा वाढतच आहे. प्रदर्शनाची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ‘मदरलँड’ १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होऊ शकतो, असे वृत्त होते. पण निर्मात्यांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात सलमान खानच्या विरुद्ध अभिनेत्री चित्रांगदा सिंग दिसणार आहे. याचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत.






