होतं असं कधी कधी
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर ‘शेलार असं विधान करु शकत नाहीत’ असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलारांची पाठराखण केली आहे.
फडणवीस म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता विशेषत: आशिष शेलार हे कोणतेही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी तर काधीच नाही. काल झालेल्या पत्रकार परिषद किंवा प्रेस नोटमध्ये याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.’
तर, आपल्यावर झालेल्या आरोपांबद्दल शेलार यांनी पत्रकारांना प्रतिक्रीया दिली. यावेळी राज्य सरकाराचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार उघड केला म्हणून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करुन शिवसेनेकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला.
आशिष शेलार यांनी म्हणाले होते, बीडीडी चाळीत जो सिलेंडर ब्लास्ट झाला. त्यामध्ये नागरिक गंभीर जखमी झाले. त्यामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळक फिरवणारा आहे. नायर रुग्णालयात 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ दुर्लक्ष झाले, असा आरोप शेलार यांनी केला होता. तर सिलिंडर स्पोटानंतर ७२ तासानंतर मुंबई महापौर पोहचतात, एवढे तास कुठे निजला होतात? असे शेलार म्हटल्याचा उल्लेख चाकणकर यांनी पत्रात केला आहे. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला. भायखळ्याचे गुंड सभागृहाबाहेर स्थायी समिती अध्यक्षांनी आणून ठेवले होते. यशवंत जाधव यांनी सभागृहात आमच्या नगरसेविकांना धमकी दिली. कोरोना काळात इतके गुंड सभागृहाबाहेर आणून गर्दी केली. यशवंत जाधव यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली होती.






