मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत (Wine seling) मागील सप्ताहात घेतलेल्या निर्णयाचा फरेविचार करण्याचे संकेत दिले होते. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील सप्ताहात घेतेलेल्या निर्णयांच्या इतिवृत्ताला कोणत्याही दुरूस्ती शिवाय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे वाईनच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाईनविक्रीवर निर्णयावर सरकार ठाम
राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नबाब मलिक यानी याबाबत माध्यमांशी बोलताना भाजप नेत्यांवर टिका केली आहे. त्यांनी सांगितले की या निर्णयाबाबत राज्य मंत्रिमंडळात कोणतेही मतभेद असण्याचे कारण नसून मागील सप्ताहात घेण्यात आलेल्या निर्णयावर सरकार ठाम राहिले आहे.
[read_also content=”माजी खासदार गजानन बाबर यांच्या निधनाने शिवसेनेचा बुलंद तोफ हरपली -डॉ.नीलम गोऱ्हे https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/reaction-of-dr-neelam-gorhe-regarding-former-mp-gajanan-babar-231559.html”]
दरम्यान, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला असून निर्बंध शिथील करण्याबरोबरच ग्रामिण भागात लसीकरणाच्या मोहिमेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या सादरीकरणात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात तिस-या लाटेचा प्रभाव कमी होत असून त्यामुळे येत्या काळात दहावी बारावीच्या परिक्षा ऑफलइनच घ्याव्या याबाबत राज्यमंत्रिमंडळात चर्चा करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यानी दिली आहे. राज्यात सुमारे चार लाख विद्यार्थ्याना दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑनलाइन पध्दतीने परिक्षा देण्याची व्यवस्था करणे अशक्य असल्याचे राज्य परिक्षा मंडळाकडून सांगण्यात आले असून पारंपारीक पध्दतीनेच या परिक्षा घेतल्या जाणार आहेत, असे प्रा गायकवाड यांनी सांगितले.
[read_also content=”मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय – महाराष्ट्र परिवहन कायद्याच्या दुरूस्तीचे विधेयक मागे https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-meeting-decision-about-taking-back-maharashtra-transport-law-change-bill-nrsr-231548.html”]