मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या चरणी लीन, सहकुटुंब घेतलं दर्शन
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी देखील लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी हजेरी लावतात. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी देखील उपस्थित राहतात. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (16 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्राक्ष देखील आरतीमध्ये सहभागी झाले होते. गणपती बाप्पा आशीर्वाद देईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, सकाळी उमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. उद्या अनंत चतुर्थी असल्याकारणाने देशभरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जण होईल. त्यापार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सर्वच भाविक गर्दी करत आहेत.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde visits Lalbaugcha Raja and offers prayers to Lord Ganesh, in Mumbai. pic.twitter.com/pCVrNastyj
— ANI (@ANI) September 16, 2024
जगभरातील श्रीमंतांच्या यादीत समावेश होणारे मुकेश अंबानी यांच्या कुटुंबानं लालबागचा राजा गणेश मंडळाला पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी योगदान दिलं. त्याचप्रमाणे रिलायन्स फाउंडेशननं 24 डायलिसिस मशीन देखील लालबागचा राजा मंडळाला दिल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी मंडळाच्या कार्यात अंबानी कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला आहे. अंबानी कुटुंबाच्या याच कामाची दखल म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अनंत अंबानी यांची प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समितीत नेमणूक केली आहे.