मुंबई मेट्रोचे 9 चे काम प्रगतीपथावर, दहिसर ते काशीगाव प्रवास कधी करता येईल? जाणून घ्या (फोटो सौजन्य-X)
Mumbai Mertro Line 9 : उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो-९ च्या चार स्थानकांमध्ये मेट्रोची चाचणी सुरू करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चाचणी रन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ४,९७३ किमी मार्गावरील दहिसर (पूर्व) आणि काशी व्हिलेज स्टेशन दरम्यान ही चाचणी घेण्यात येईल. चाचणीसाठी १० मे रोजी ४,९७३ किमी मार्गावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. याचदरम्यान आता एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे.
या अंतर्गत, भाईंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील [ROB] अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले. ही कामगिरी सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेळेच्या बंधनात उत्कृष्टतेने पार पाडण्यात एमएमआरडीएचे योगदान आहे.
लांबी – १०.५४ किमी | स्थानके – ८ उन्नत | एकूण प्रगती – ९५%
गर्डर माप – ६५ मीटर लांब, ९.५७५ मीटर रुंद, सुमारे ७०० मेट्रिक टन वजन
गर्डर रचना – ३ भागांमध्ये (प्रत्येकी सुमारे २३५ मेट्रिक टन वजन, ३ मीटरहून अधिक खोल )
कार्यक्षेत्र – भायंदर पश्चिम, पश्चिम रेल्वे मार्गावर (अतिशय आव्हानात्मक आणि दाट लोकवस्तीचा भाग)
साधने – ६०० मेट्रिक टन व ७५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन्स वापरले; ६०० मेट्रिक टनची एक राखीव क्रेन
• टप्पा १: दहिसर (पूर्व) – काशिगाव (डिसेंबर २०२५)
• टप्पा २: काशिगाव – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (डिसेंबर २०२६)
अशा महत्त्वपूर्ण टप्प्यांद्वारे एमएमआरडीए मुंबईतील नागरी वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सातत्याने पुढे वाटचाल करत आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
मुंबई मेट्रो-९ कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गाचे ८५% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे. या मार्गावर एकूण ८ स्थानके आहेत. चार स्थानके चाचणीसाठी तयार आहेत. इतर चार स्थानके तयार होताच, मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर चाचणी धावणे सुरू केले जाईल. २०२५ च्या अखेरीस मेट्रोच्या या मार्गावर सेवा सुरू करण्याची योजना एमएमआरडीएने आखली आहे. मेट्रो-९ कॉरिडॉर देखील मेट्रो-७अ शी जोडण्यात आला आहे.
मेट्रो ९ स्थानके (पहिला टप्पा)
– दहिसर (पूर्व)
– पांडुरंगवाडी
– मिरगाव
– काशी गाव
दुसरा टप्पा
– साई बाबा नगर
– मेडिटिया नगर
– शहीद भगतसिंग गार्डन
– सुभाषचंद्र बोस स्टेडियम