सौजन्य- iStock
Mega Block: उद्या मुंबईतील तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर आणि पनवेल ते वाशी स्टेशनदरम्यान ब्लॉक जाहिर केला आहे. तर पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. या मेगा ब्लॉकमध्ये रेल्वे रुळ, सिग्नल्सची देखभाल, अभियांत्रिकी आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावणार आहेत तसेच ऐक्सप्रेस गाड्याही 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावतील अशी माहिती रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. प्रवाशांना या मेगाब्लॉकनुसार होणाऱ्या बदलाचा विचार करुन प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
पश्चिम रेल्वे
बोरीवली स्थानकापासून ते राम मंदिर स्थानकापर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. काही बोरिवली आणि अंधेरी गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंतच धावतील.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत ब्लॉक असेल. याकाळात अप मेल / एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच डाऊन मार्गावरील मेल / एक्सप्रेस गाड्या डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉंक असणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेल या दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.मात्र सीएसएमटी स्थानक ते वाशी, ठाणे ते वाशी, नेरुळ , बेलापूर – नेरूळ आणि उरण या दरम्यान लोकल ट्रेन उपलब्ध होणार आहेत.
मेगाब्लॉक दरम्यान जर गरजेचे असेल तरच प्रवाश्यांनी प्रवासाकरिता बाहेर पडावे अन्यथा पाऊस आणि मेगा ब्लॉकमुळे प्रवास करताना मोठी कसरत करावी लागू शकते.