मुंबई : केंद्रात देखील कार्यक्षम संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला अर्थात उत्पल पर्रीकर यांना भाजपानं उमेदवारी नाकारल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. उत्पल पर्रीकर यांना भाजपानं उमेदवारी नाकारलीच नाही, असा दावा फडणवीसांनी केला आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या रुपाने भाजपाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला. पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपाला रामराम ठोकत पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. एवढंच नसून पणजीमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.